Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गोवे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भावना कापसे यांची बिनविरोध निवड ,

 गोवे ग्रामपंचायत उपसरपंचपदी भावना कापसे यांची बिनविरोध निवड                                         

श्याम लोखंडे - कोलाड     


  
 रोहा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गोवे येथील कार्यरत असलेले उपसरपंच नितीन तानाजी जाधव यांनी आपल्या ठरलेल्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार ठराविक पदभार स्वीकारले आणि आपल्या बोलीभाषे प्रमाणे व दिलेल्या वचनाशी एकनिष्ठ राहून आपल्या पदाचा राजीनामा दिला   तद्नंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी शुक्रवार दि.११/२/२०२२ रोजी भावना भरत कापसे यांचा एकमेव अर्ज दाखल केल्यानंतर उपसरपंच पदी भावना कापसे. यांची बिनविरोध निवड या ग्रामपंचायतीवर करण्यात आली.

                      रायगडचे खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री  अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,यांच्या मार्गदर्शनातून ही ग्राम पंचायत बिनविरोध करण्यात आली होती. तसेच त्यांच्या विकास कामांच्या जोरावर येथील जनतेनी ग्राम पंचायतीवर दिलेली एकहाती सत्ता त्यामुळे त्या माध्यमातून होत असलेली विविध विकास कामे या पार्श्वभूमीवर येथील सद्स्य वचनांचे पालन करत असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी ग्रुप ग्राम पंचायत सरपंच महेंद्रशेठ पोटफोडे, माजी उपसरपंच नितीन जाधव,आंबेवाडी जिल्हा परिषद गटाचे विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,माजी सरपंच रामशेठ कापसे,युवानेते राकेश शिंदे,माजी उपसरपंच संदीप जाधव, ग्राम पंचायत सदस्य नरेंद्र पवार, सुप्रिया जाधव, रंजिता जाधव, निशा जवके, अंजली पिंपळकर,सुमित गायकवाड, आदी उपस्थितीत गोवे,मुठवली,शिरवली येथील ग्रामस्थ तसेच कोलाड विभागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लहू पिंपळकर,भरत कापसे,रमण कापसे, संदेश कापसे,संजय मांडळुस्कर,बि. एस. भोसले, सायदेव कुशवहा, राजेंद्र जाधव,राकेश कापसे,तानाजी मोरे,मधुकर कापसे, गणेश कुशाळकर, नाना कापसे,बाळ कापसे, अजिंक्य गायकवाड, बाळू कापसे,नितीन जवके,नितीन कापसे,जयेश धुलूप, रमेश गायकवाड, अनंत पवार, अंबाजी कापसे,ग्रामसेवक शिद,तसेच सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित विराजमान झालेल्या उपसरपंच भावना कापसे यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies