Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामासंदर्भात थेरोंडा ग्रामस्थ आक्रमक झाले असून करणार उपोषण.

 रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे कामासंदर्भात थेरोंडा ग्रामस्थ आक्रमक झाले असून करणार उपोषण.

  • अर्धवट अवस्थेत असलेल्या रस्त्यामुळे अनेकजण जखमी.
  • अधिकारीवर्ग दुर्लक्ष करत असल्याचा ग्रामस्थ करताहेत आरोप.

अमूलकुमार जैन-अलिबाग


रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील एम . एस . एच ०४ रेवदंडा हायस्कूल ते थेरोंडा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे व अर्धवट काम झाले असून त्या संदर्भात थेरोंडा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

तसेच अभियंता अधिकारी कंत्राटदाराला पाठीशी घालत असून स्थानिक ग्रामस्थांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे थेरोंडा ग्रामस्थ उपोषण करणार असल्याचा "' निर्णय थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे पॅकेज क्रमांक RAI - ११ च्या अंतर्गत थेरोंडा रस्त्याचे २.३५ किलोमीटर लांबीच्या कामाची रुपये ११२.४४ लक्ष मात्र, असलेली  वर्कऑडर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था या  कार्यालयाकडुन २०१७ रोजी मे सुप्रभात इन्फ्राझोन प्रा. लिमिटेड यांच्या नावे काढलेली आहे. 

 सदर काम सुरु करण्याचे दिनांक १८/०८/२०१७ असून काम पूर्ण करण्याचा कालावधी १ वर्ष असा आहे, तरी प्रत्यक्षात या कामाचा पहिला १०० मिटरचा थेरोंडा वरसोलपाडा येथील क्रॉकीटीकरणाचे काम मार्च एप्रिल २०२० मध्ये झाले असून सदरील कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे.

 तसेच थेरोंडा वरसोलपाडा येथील उर्वरीत रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हे मे २०२१ पासुन चालू झाले असून या ठिकाणी १०० मी. मी. जाडीची खडी टाकण्यात आली आहे. 

 परंतु अद्याप त्यावर  इतर रस्त्याचे कोणतेही साहित्य टाकलेले नसून रस्ता अपूर्ण स्थितीत आहे. 

त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत अनेक शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक यांना गंभीर दुखापत झाली असून अनेकांना रुग्णालयात देखील दाखल व्हावे लागले आहे असे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले आहे.

थेरोंडा वरसोलपाडा येथील रस्त्याच्या  कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून सदरील वर्क ऑर्डर मध्ये ५ पाईप च्या मोऱ्या असून त्या देखील आज तारखेपर्यंत टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात  मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यास त्याचा निचरा होऊ शकणार नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून लवकरच रस्ता खराब होण्याची मोठी शक्यता आहे.

या कामासंदर्भात थेरोंडा ग्रामस्थांनी अलिबाग तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाशी संपर्क साधला असता, 

त्यांना या रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदाराने केलेल्या कामाचे अंदाजे ₹.२३,००,०००/- ( अक्षरी तेवीस लाख ) अदा करण्यात आले आहे, असे थेरोंडा ग्रामस्थांनी सांगितले आहे.

अलिबाग तालुक्यातील  प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालयाशी संपर्क साधून सदर कामाची आपल्या कार्यालयाकडून लक्ष देवून सखोल चौकशी करण्यात यावी. थेरोंडा ग्रामस्थांची कळकळीची विनंती तसेच उर्वरीत बाकी असलेल्या कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा असण्याची अपेक्षा आहे व महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ जनतेला मिळावा."' अश्या आशयाचे पत्र स्थानिक ग्रामस्थांच्या सह्या घेऊन दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कार्यालय, अलिबाग येथे पाठविले आहे. 

त्याची प्रत स्थानिक आमदार महेंद्र दळवी, प्रधान सचिव ग्रामविकास विभाग, फोर्ट यांना देखील पाठविली आहे. 


"'मात्र आजतागायत कोणताही अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी देखील आला नसल्याने व आमच्या मागणीला देखील दाद देत नसल्यामुळे व येथे घडणाऱ्या अपघाताला रोखण्यासाठी आम्ही लवकरच उपोषणाला बसणार आहोत."' असा निर्णय आक्रमक झालेल्या थेरोंडा ग्रामस्थांनी घेतला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies