जेष्ठ पत्रकार व्यंगचित्रकार रविंद्र कुवेसकर रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र मिरर टीम-माणगांव
जिल्ह्यातील २६० जनांना रायगड भूषण सन २०२०-२०२१ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माणगांव उतेखोल येथिल जेष्ठ पत्रकार तथा व्यंगचित्रकार रविंद्र कुवेसकर यांना ही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व स्तरातील त्यांचे मित्र परिवाराकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली वीस वर्षाहुन अधिक काळापासून आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातुन तसेच सोशल माध्यमांवरील त्यांनी केलेले लिखाण जनमनाला भावले आहे.
दोन वर्ष महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष तसेच विशेष कार्यकारी अधिकारी, कामगार क्षेत्रातही युनियन लिडर म्हणुन काम केले आहे कोमसाप शाखा माणगांवचे सदस्य राहीले आहेत, कोव्हिड कालावधी तही आपल्या लेखणीद्वारे जनजागृती केली आहे. विवीध सामाजिक समस्यावर पत्रकारितेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकुन त्यातील अनेक समस्यांचा पाठपूरावा केला आहे. आज खऱ्या अर्थाने आपण करीत असलेल्या कामाला पोचपावती मिळाली व पुरस्काराला खरा चेहरा लाभला! असल्याच्या प्रतिक्रिया माणगांवातील अनेक मान्यवरांनी स्वतः कुवेसकर यांचेशी प्रत्यक्ष भेटून व मोबाईल वरुन संपर्क साधित व्यक्त केल्या आहेत.