आत्करगांव-मांदाड आणि सावरोली तलावाला जल संवर्धन योजनेतुन भरीव निधी
आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून होणार तलावांची दुरुस्ती
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
- आत्करगाव_मांदाड व सावरोली पाझर तलाव कात टाकणार
- खालापूर मधील नागरिकांनी मानले आमदार थोरवे यांचे आभार
- आमदार महेंद्र थोरवे यांचा विकासकामांचा सपाटा
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी
गेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळवत आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांचा करिष्मा कायम ठेवत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून विकासकामांवर जोर देत कर्जत खालापूर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावत जनतेतून काम मार्गी लावणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण केली आहे.
मुख्यमंत्री जल संवर्धन योजनेतून खालापूर तालुक्यातील पाझर तलाव आत्करगाव_मांदाड व पाझर तलाव सावरोली या तलावांच्या योजनेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावास रू.२,७५,४०,४१७/_ आणि २,०७,४५,२३०/_रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता आमदार थोरवे यांनी प्राप्त करून घेतली आहे लवकरच या कामाला सुरुवात होईल.खालापूरम जनतेमधून आमदार महेंद्र थोरवे आणि जलसंवर्धन मंत्री शंकरराव गडाख-पाटील यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.