Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी माणगांवात राबविले प्रेरणादायी स्वच्छता अभियान

जेष्ठ निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दी वर्ष स्वच्छता अभियान

रविंद्र कुवेसकर-माणगांव


जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशाचे स्वच्छतादूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा सौजन्याने माणगांव येथे मंगळवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७.३० वा. पासून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात १११० श्री सदस्य सहभागी झाले होते. या अभियानात शहरातील सरकारी कार्यालयांची प्रांगण व मुख्य रस्त्यांची सफाई करण्यात आली. अशा प्रकारे माणगांव शहरात एकूण ८ विभागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एकूण ३४ टन कचरा हा ३१ वाहनांच्या साहाय्याने उचलून डंपिंग ग्राउंड मध्ये व्यवस्थित टाकण्यात आला.

सकाळ पासुनच स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक श्रीसदस्याने कोरोना प्रतिबंधक नियम पाळत मास्क व हँण्डग्लोव्हज घालुन, हाती स्वच्छतेची साधने घेऊन रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेले गवत, कचरा, प्लास्टिक बाटल्या उचलून शहर स्वयंस्फूर्तपणे शिस्तबद्धतेने स्वच्छ केले आहे. या मोहिमे अंतर्गत माणगांव मध्ये हायवे ते उपजिल्हा न्यायालय व शासकिय विश्रामगृह परिसर, जीवन प्राधिकरण कार्यालय, जलशुध्दी केंद्रात, तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, काळ प्रकल्प कार्यालय उतेखोल नदिकिनारी घाटांवर, तसेच कृषी अधिकारी कार्यालय, उप विभागीय पोलीस अधिक्षक कार्यालय, गणेश काॅम्प्लेक्स ते प्रांत कार्यालय, आदर्शसमता नगर सभागृहा बाहेरील परिसर, मध्यवर्ती प्रशासकीय भवन, बामणोली रोड, कालवा रोड, कचेरी रोड आणि मोर्बा रोड या मार्गावर स्वच्छता करण्यात आली आहे. 

धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने देशात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. आरोग्य शिबीर, वृक्षा रोपण-संवर्धन, दिव्यांगाना साहित्य वाटप, नैसर्गिक आपत्ती कालात मदत, रक्तदान शिबीर, धरणातील गाळ काढणे, जलपुनःर्भरण इत्यादी उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन माणगांव शहरातील ८ विभागामध्ये हे अभियान यशस्वी राबविण्यात आले आहे. यावेळी शिवसेना नेते राजीव साबळे, माणगांव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, स्वच्छता व आरोग्य सभापती अजित तार्लेकर, पाणीपुरवठा सभापती राजेश मेथा, बीजेपी नेते संजय आप्पा ढवळे, पोलीस उप अधिक्षक प्रवीण पाटील, मा. ता. पत्रकार सेवा संघ अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रविंद्र कुवेसकर, माणगांव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सलिम शेख, माजी नगर सेवक संदीप खरंगटे, पंस.माजी सभापती संगीताताई बक्कम यांनी देखील श्री सदस्यांच्या सोबतीने स्वच्छता मोहिमेत हिरहिरिने सहभाग घेतला.

आज माणगांव स्वच्छ होणार याची दखल माणगांवकरांनी घेऊन त्यापासुन प्रेरणा घेत आपल शहर स्वच्छ राहिल याची काळजी घ्यावी. स्वच्छतेच महत्व आपण सर्वांनी कोरोना सारख्या संकटात चांगलच जाणलय. आपल स्वतःच आरोग्य जेवढ अनमोल आहे तेवढच सामाजिक स्वच्छता व आरोग्यही महत्वाच आहे. कारण केवळ आपलाच परिसर नाही तर इतर सर्वच सार्वजनिक ठिकाण स्वच्छ राखली तरी आपणच सुरक्षित राहणार आहोत. कारण अस्वच्छतेमुळे होणारी रोगराई संसर्ग हा कोणालाही सोडत नाही, स्वच्छते मुळेच आपण आपले कुटुंब मुलबाळ खेळताना बागडताना मोकळा श्वास घेऊन निरोगी जीवन जगु शकतो. खरतर श्री दास भक्तांनी आज माणगांव शहर स्वच्छ केले ते स्वच्छ ठेवण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. एक उदात्त हेतुने आज रोजी केलेली प्रेरणादायी स्वच्छता मोहिम ही खऱ्या अर्थी तेंव्हाच सार्थकी लागेल हाच या मागचा खरा तिर्थरुप नाना साहेब धर्माधिकारी यांचा आपल्या सर्वांना बोध संदेश आहे. अशीच भावना या निमीत्ताने श्री सदस्यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies