एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये अन्य शाळांमधील मुलानाही घेता येणार स्विमिंगपुल मध्ये पोहण्याचा आनंद
ओंकार रेळेकर- चिपळूण
एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळ चे चेअरमन तरुण उद्योजक अँड.अमोल चंद्रकांत भोजने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते ७ वी पर्यंत मुलांना सीबीएसई बोर्ड पॅटर्न चे शिक्षण दिले जाते जागतिक पातळीवर दिले जाणारे आद्ययावात शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत चेअरमन अमोल भोजने स्वतः मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देऊन आहेत.चिपळूण मधील मुलांना स्विमिंगचा आनंद लुटता यावा या करिता एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये ४ ते २० वयोगटातील सर्वच मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे,
येथे लहान मुलांन करिता आणि मोठ्या मुलांकरिता स्वतंत्र स्विमिंगपुल असून वेळोवेळी टेक्निशियन कडून पाहणी करून तसेच पाण्याचे फिल्टरेशन करून स्विमिंगपूल ची देखरेख ठेवली जाते तसेच पोहण्याचा अनुभव असलेले ट्रेनर संतोष कोटकर कायमस्वरूपी येथे सेवेत आहेत .ग्रुपने प्रवेश घेतल्यास स्कूलच्या वतीने विशेष सवलत देण्यात येणार आहे तर चिपळूण मधील अन्य शाळा, महाविद्यालय किंवा २० वयोगटातील मुले तिमाही,सहामाई,वार्षिक प्रवेश घेऊ शकतात . येथे नियमित शिक्षण घेणाऱ्या मुलांकरिता शाळेच्या सुट्टीच्या काळातही विनाशुल्क पोहण्याची मोफत संधी देण्यात आली आहे.स्विमिंगपुल मध्ये प्रवेश घेण्याकरिता एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळ येथे संपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन स्विमिंगपुल पाहूनच आपला प्रवेश आजच निश्चित करा असे आवाहन स्कूल च्या वतीने करण्यात आले आहे.