Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अपूर्वा पवार व अस्मिता पवार यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये उज्वल यश

अपूर्वा पवार व अस्मिता पवार यांचे एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये उज्वल यश

मिलिंदा पवार- सातारा

श्री
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नव महाराष्ट्र विद्यालय चितळी, ता. खटाव मधील कु. अपूर्वा राजाराम पवार व कु. अस्मिता राजाराम पवार या दोन विद्यार्थीनींनी एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या एन. एम. एम. एस. परीक्षेमध्ये उज्वल यश मिळविले. या परीक्षेसाठी विद्यालयातील ८ विद्यार्थीबसले होते.त्यापैकी ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

 N.M.M.S परीक्षा उतीर्ण झालेल्या खटाव तालुक्या तील लक्षीत गटातील १६९ विद्यार्थ्यांना  सारथी शिष्यवृत्ती साठी निवडण्यात आले. त्यापैकी नवमहाराष्ट्र विद्यालयातील कु. अपूर्वा पवार व  कु अस्मिता पवार या दोन विद्यार्थिनींनी सारथी शिष्यवृत्ती प्राप्त केली त्यांना प्रत्येकी रुपये ९६००₹ रुपये मिळणार आहेत.मुख्याध्यापक जी. ए .साठे  N.M.M.S शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सौ यू.व्ही .हं हांगे, विषय शिक्षक  व्ही. डी .हांगे, व्ही .पी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे . एक्झिक्युटिव्ह ऑफिसर  कौस्तुभ गावडे यांचे ही मार्गदर्शन लाभले. 

संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व सचिवा शुभांगीताई गावडे  प्रशासन सहसचिव  आर.व्ही. शेजवळ यांनी  विद्यालयातील कु अपूर्वा पवार व अस्मिता या यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies