चिपळूण वनविभागाचे रुपडे पालटल!!!
नव्या इमारतीला आकर्षक रंगरंगोटी वन्य जीवांनविषयी होत आहे जनजागृती
ओंकार रेळेकर-चिपळूण
चिपळूण उपविभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे रुपडे पाळटनार आहे .वन्य जीवांविषयी जनजागृती करीत इमारतीच्या भिंतींवर वन्य प्राणी,पक्षी,कोकणातील वनराई,राज्य वृक्ष ताम्हण,राज्य पक्षी हरियाल,ब्लु मॉर्मन फुलपाखरू,शेकडू,खारपुटी जंगल,महाराष्ट्र वनविभाग मानचिन्ह ,आणि कमी दिसणारे प्राणी आदी चित्र रेखाटण्यात आली आहेत,येथे येणाऱ्या नागरिकांसाठी हे रंगीत काम आकर्षणाचा विषय ठरत आहे.वनविभाग कार्यालय आता वनभवन म्हणून ओळखले जाणार आहे.या कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारावर वनभवन असे नाव देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध झालेल्या निधी मधून आकर्षक रंगरोटी करण्यात येत असून आम्रपाली शैक्षणिक साहित्य पेंटिंग आर्ट यांच्या मार्फत सदर चित्र रेखाटण्याचे काम सुरू असून पुणे,गोंदिया,भंडारा,कोल्हापूर,सातारा,आदी अनेक मोठं मोठ्या शहरात आम्रपाली यांच्या वतीने अशा प्रकारची पेंटिंगची कामे केली गेली आहेत,आम्रपाली आर्टिस्ट चे प्रमुख सीताराम घारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.निलेश बापट हे आम्रपाली च्या वतीने येथे कामकाज पाहत आहेत.संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच होत असलेले रेस्ट हाऊस चे काम प्रगती पथावर असून रेस्ट हाऊस इमारतीला ही आशा प्रकारचे डिझाईन केले जाणार आहे, पुढे जिल्हयात रत्नागिरी,चिपळूण,खेड रेल्वेस्टेशन आवारातील भिंतींवर वनविभागामार्फत वन्य प्राण्यांविषयी जनजागृती करण्यासाठी चित्र रेखाटन केले जाणार आहे अशी माहिती उपविभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांनी दिली.