समाजकार्याची गरुड’झेप’!
चित्रा पाटील नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्काराने सन्मानित
अमूलकुमार जैन- अलिबाग
यावेळी दुबईस्थित बु अब्दुल्ला समुहाचे प्रमुख महाराष्ट्र महसुल विभागाचे सह सचिव डॉ.माधव वीर, शेख मजीद रशीद अल मुल्ला,डॉ. प्रल्हाद मोदी, डॉ. नवदीप सिंग, एच.आर.एच.राजकुमारी जॉय पेट्री, डॉ.अर्शी झवेरी,महाराज सारा अब्बास, जयश्री राव,करण वर्मा, वैशाली सामंत, शिवांशी श्रीवास्तव,अमिषा पटेल, गुलशन ग्रोव्हर, राम शंकर, तानाजी जाधव, डॉ. जयप्रकाश सिंघानीया, प्रदिप जगताप आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक, सांस्कृतिक राजकीय क्रिडा, कला व स्थापत्य या क्षेत्रात देश-विदेष्यातील 1700 लोकांपैकी उल्लेखनीय कामगिरी करणार्या 68 जणांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. चित्रा पाटील यांनी झेप फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो महिलांना रोजगार देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नेल्सन मंडेला पीस अवार्ड अकादमीने चित्रा पाटील यांची सामाजिक क्षेत्रातील नि:स्वार्थी आणि समर्पित सेवेबद्दल निवड केली.
अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनशी संलग्न असणार्या सेंट मदर टेरेसा नेल्सन मंडेला नोबल पीस अवार्ड अकादमीचे संस्थापकीय अध्यक्ष डॉ. राजकुमार टाक यांनी सर्वांचे स्वागत केले. चित्रा पाटील यांना पुरस्कार आणि मानद पदवी मिळाल्यानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.