माथेरानमध्ये राम जन्मोत्सव उत्साहात साजरा
चंद्रकांत सुतार - माथेरान
माथेरान मध्ये गुढीपाडवा ते राम नवमी पर्यत वसंतोत्सवाला सुरवात झाली आहे मागील दोन वर्षा च्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणताच सण साजरा करता आले नव्हता आजचा राम नवमीचा महत्चाचांदिवस आज सकाळ पासूनच राम मंदिर येथे काकड आरतीने राम जन्माष्टमी ला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.
माथेरानला आलेल्या पर्यटकांनी मोठ्या संख्येने राम मंदिरात उपस्थिती लावून दर्शन घेतले हरिपाठ भजनी मंडळ यांच्या सुश्राव्य भजनांनी भक्तिमय वातावरण निर्माण झाले, दुपारी ठीक 12-35 प्रभू श्रीरामा चा जन्म सोहळा साजरा करण्यात आला यावेळी मंदिर ट्रस्टचे माथेरान ग्रामस्थ उत्सव मंडळाचे पदाधिकारी व माथेरान मुख्यधिकारी सुरेखा भणगे, पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे तसेच, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, दिवस भर आजच्या राम जन्मास्तमी निमित्त कार्यक्रम चालू होते तर संध्याकाळी सहा वाजता श्री राम मंदिर येथून पालखी सोहळा शिव मंदिर पर्यन्त होणार आहे,