संप राज्य सरकारने आमच्यावर लादला आहे.:-राकेश सावंत
अमूलकुमार जैन- अलिबाग
महसूल कर्मचारी यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने अध्यादेश जारी करावा, अशा मागण्या संघटनेचे राज्य राकेश सावंत यांनी यावेळी केल्या.मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार राज्यभरात सुमारे २२ हजार महसूल कर्मचारी बेमुदत उपोषणात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जनतेची कामे खोळंबली आहेत. परंतु हा संप राज्य सरकारने आमच्यावर लादला आहे असल्याचे रायगड जिल्हा महसूल संघटनेचे माजी अध्यक्ष राकेश सावंत यांनी अलिबाग येथील हिराकोट येथे सांगितलं. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
महसूल कर्मचाऱ्यांनी शासनाकडे आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकरिता विविध टप्प्यांमध्ये आंदोलन केलीत. पण, शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळाले नाही. गेल्या आठ दिवसांपासून कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच उपविभागीय कार्यालये व तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे.
गुरुवारी कर्मचार्यांच्या प्रतिनिधींची मुंबईत अपर मुख्य सचिवांशी बैठक झाली. त्यातही कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. केवळ आश्वासन मिळाले. त्यामुळं हा संप कायम ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आलाय. गुरुवारी संपकरी कर्मचार्यांचे एक शिष्टमंडळ मुंबई मंत्रालयस्तरावर अपर मुख्य सचिवांशी भेटले. मात्र, त्यांना केवळ आश्वासन देण्यात आले. संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली. परंतु, शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळं हा संप कायमच राहणार असल्याचे
या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
महसूल प्रवर्गातील अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रक्रिया रखडली आहे. महसूल सहाय्यकाचे रिक्त पद भरण्यात आलेली नाहीत. एक कर्मचार्याकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. कर्मचार्यांवर कामाचा बोजा वाढला आहे. या समस्या सोडविण्यात याव्यात, यासाठी रायगड जिल्हा महसूल तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात कर्मचार्यांनी चार एप्रिलपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे. महसूल विभागातील वरिष्ठ लिपिक आणि मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात यावी, तसेच महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू असून, आज उपोषणाचा आठवा दिवस होता. महसूल कर्मचारी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. वरिष्ठ लिपिक आणि मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. पदोन्नती मिळालेल्या नायब तहसीलदार संवर्गाची राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठता यादी एकत्रित करण्यात यावी. तसेच महसूल सहाय्यक पदांची भरती करण्यात यावी. राज्य सरकारने रिक्त पदांची भरती न केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे सरकारने रिक्त पदे तत्काळ भरावीत.अशी मागणी जोर धरत आहे.