Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला गंभीर अपघात,तीनजण दगावले तर 34 प्रवासी जखमी.

 म्हसळा घोणसे घाटात खासगी बसला गंभीर अपघात,तीनजण दगावले तर 34 प्रवासी जखमी.

गंभीर 15 प्रवाशांना उपचारासाठी माणगाव,महाड आणि अलिबाग येथे दाखल.

महाराष्ट्र मिरर टीम -म्हसळा 


विरार नालासोपारा येथुन श्रीवर्धन बोर्लीकडे प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्राजक्ता ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच 04 एफके 6614 या खासगी बसला घोणसे घाटातील तीव्र उतार वळणावर भीषण अपघात होऊन अपघातात 3 प्रवाशी ठार तर 34 प्रवासी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये 15 प्रवाशी गंभीर आसुन त्यांना पुढील उपचारासाठी माणगाव,अलिबाग येथे आणि महाड येथे हलविण्यात आले असल्याचे डॉ.सुशांत गायकवाड यांनी माहिती देताना सांगितले.
      10 ते 15 वर्षा पुर्वी अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात पर्यायी मार्ग झाले पासुन अपघातांची होत असलेली मालिका खंडित होऊन जीवितहानी थांबली असताना प्राजक्ता ट्रॅव्हल चालकाने गाडी बेदरकारपणे चालवुन निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवित हानीस कारणीभूत ठरला आहे.माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर म्हसळा पासुन 6 किमी अंतरावरील घोणसे घाटातील शेवटच्या तीव्र उतार वळणावर सकाळी 7.40 वाजताचे दरम्यान गाडी अंदाजे 60 फूट उंचावरून भरधाव वेगाने कोसळून भीषण अपघात झाला.यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील अश्विनी शैलेश बिरवाडकर,वय वर्षे 35,रा.धनगरमलई,मधुकर बिरवाडकर,वय वर्षे

60,रा.धनगरमलई,सुशांत रिकामे वय वर्षे 28,राहणार वडघर पांगलोली यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.या अपघातात 34 प्रवाशी जखमी झाले आहेत.जखमींमध्ये 15 प्रवासी गंभीर असल्याचे सांगण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमींना उपचारासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार करण्यात आले आहे.22 ते 25 प्रवासी क्षमता असलेल्या अपघाती बसमध्ये दोन चालकांसह 35 प्रवाशी मुंबई उपनगरातील विरार नालासोपारा येथुन बोर्ली - श्रीवर्धनकडे प्रवास करीत होते.अपघातात जखमींमध्ये वाहन चालक स्वप्नील दिलीप साळुंखे,सातारा,चालक देवेंद्र भाईप विरार,रा.विरार ,पार्थ बिरवाडकर,दिप बिरवाडकर,दिव्या बिरवाडकर,प्रतिभा बिरवाडकर,रा.धनगरमलई,सदानंद सोलकर,शैलेश सोलकर,विशाखा निमरे,विपुल निमरे रा.देवखोल,नेहा थळे, सुप्रिया रिकामे,सुधीर रिकामे,सृती खळे,श्रेया खळे,वैदही खळे,सर्व रा.नागलोली,पंकज बिरवाडकर,तुकाराम साबळे,सरस्वती साबळे,प्रतिभा बिरवाडकर,रा.धनगरमलई,अभय पाडावे,भालचंद्र पाडावे,प्रेरणा पाडावे,वैष्णवी पाडावे, विजय पाडावे,वेदांत पाडावे,विर पाडावे,तेजस बिरवाडकर सर्व रा.बोर्ली,शांताराम पवार,श्रावणी नटे,शास्वती खळे,निहाल खळे,मंदा पवार,वेदांत पाडावे सर्व रा.खुजारे हे प्रवाशी जखमी झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे.अपघाताची म्हसळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आसुन अधिक तपास सुरू आहे.

अपघात होण्यापूर्वी गाडी घोणसे घाटात येताना दुसऱ्या तीव्र उतार वळणावर बस मधील एका बस चालकाने गाडीचा ताबा सोडुन दुसऱ्या बस चालकाला गाडी चालविण्यासाठी दिली होती.काही क्षणातच बस शेवटच्या तीव्र उतारावर कोसळली असे बस मधील किरकोळ जखमी प्रवासी सदानंद सोलकर- रा.देवखोल यांनी माहिती देताना सांगितले.

*अपघाताची माहिती मिळताच पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी आणि म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भेट देवुन जखमींची विचारपूस केली.अपघातग्रस्तांना तातडीने सहकार्य करण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाचे संबंधितांना सांगितले. 

घोणसे घाट पर्यायी मार्ग तीव्र उताराचा असला तरी पुर्वी सारखा अपघाती नसुन होणारे अपघात वाहन चालकाचे दुर्लक्षितपणाने किंवा गाडीत काही बिघाड झाल्यास अपघात होऊ शकतो.प्राजक्ता ट्रॅव्हल्सचा ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणी गेल्या दोन वर्षात तीन ते चार अवजड वाहनांचा अपघात झाला होता मात्र जीवित हानी झाली नव्हती.बऱ्याच अवधी नंतर घोणसे घाट अपघातात एकाच वेळी तीन जण दगावण्याची घटना घडली आहे.

गंभीर अपघाती घटनेची माहिती मिळताच श्रीवर्धन विभागीय पोलिस अधिकारी,दिघी सागरी पोलीस निरीक्षक,म्हसळा सहा.पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पोलीस कर्मचारी,वैद्यकीय अधिक्षक डॉ.मधुकर ढवळे,डॉ.महेश मेहता,डॉ.सुशांत गायकवाड अन्य शासकीय व खासगी डॉक्टर,परिचारिका,स्वयंसेवक,सर्व पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेऊन अपघात ग्रस्तांना मदत व सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies