डॉ. दिलीप येळगावकर यांच्या प्रयत्नांना यश मायणी बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी.
मिलिंदा पवार- सातारा
हा रस्ता कोणत्याच विभागाच्या कक्षेत येत नसल्याने जलसंपदा, महसूल, गावठाण यापैकी कोणाची मालकी नव्हती की त्याचा सातबारा ही तयार नव्हता त्यामुळे या रस्त्यावर निधी कोणत्या नियमात टाकायचा हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी अगदी तहसिलदार पासून ते मंत्र्यांपर्यंत हेलपाटे मारले तेव्हा कोठे विशेष बाब म्हणून महसूल मंत्र्यांनी या रस्त्यासाठी वेगळी बाब म्हणून तर त्याचा खाते उतारा तयार करून द्यावा असे आदेश खाली दिले. त्यामुळे या रस्त्याचा उतारा तयार झाल्याने हा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग करून त्यावर निधी टाकून कायमस्वरूपी पूर्ण करण्याचा निर्णय झालेला असल्याची माहिती, तसेच अनेक वर्ष प्रलंबित असलेले बाह्यवळण रस्त्याचे काम मार्गी लागेल अशी माहिती डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिली पत्रकार परिषदेस दिली . पत्रकार परिषदेस सरपंच ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते .