देशात सर्वात अग्रगण्य मानले जाणारे राज्य महाराष्ट्र आहे : आमदार अनिकेत तटकरे
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर आयोजित केलेल्या छोटेखाणी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना आमदार अनिकेत तटकरे म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे .देशात अग्रगण्य मानले जाणारे राज्य हे महाराष्ट्र राज्य असल्याचा अभिमान आहे ,या वेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी अमित शेडगे ,तहसीलदार सचिन गोसावी ,मुख्याधिकारी विराज लबडे ,नायब तहसीलदार विपुल ढुमे ,पोलीस निरीक्षक संजय सावंत ,माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक माजी जि प सदस्या प्रगती अदावडे ,माजी पं स सदस्य मंगेश कोमनाक ,माजी नगरसेवक अनंत गुरव माजी नगरसेवक वसंत यादव सुनील पवार ,आदी मान्यवर उपस्थतीत होते .पुढे बोलताना आम .अनिकेतभाई म्हणाले की राज्य शासनाने कोविड च्या महामारीत आरोग्यावर लक्ष केंद्रित केले होते ,आज दोन वर्षानंतर विनामास्क आपल्याशी संवाद होतोय ,श्रीवर्धन पोलीस ठाण्याची इमारत व कर्मचारी वसाहत जीर्णावस्थेत झाली आहे ,लवकरच प्रस्ताव तयार करून पोलीस ठाण्यासाठी व वसाहती साठी नवीन इमारत उभारण्याचा प्रयत्न करू ,पालकमंत्री आपल्या हक्काच्या असल्याने या मतदार संघात जास्तीत जास्त निधी प्राप्त करून घेऊ असे सांगून नैसर्गिक आपत्तीने या तालुक्याला खूप मोठे नुकसान केले ,परत अशी नैसर्गिक आपत्ती येऊ नये अशी सोमजाई व हरेश्वर चरणी प्रार्थना करतो ,आणि दुर्दैवाने नैसर्गिक आपत्ती आलीच तर प्रशासन तयारीनिशी सज्ज असल्याची ग्वाही दिली .
यावेळी श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या वतीने आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते पिवळ्या रेशन कार्ड धारकांना कार्ड चे वाटप तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना अंतर्गत लाभार्थ्यांना चेक चे वाटप ,मनरेगा जॉब कार्ड वाटप ,नवीन मतदार कार्ड चे वाटप करण्यात आले ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार सचिन गोसावी यांनी केले ,प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी मार्गदर्शन केले तर नगरसेवक वसंत यादव व मुख्याध्यापक ढाकणे यांनी शुभेच्छा दिल्या .