मातृत्व दिनानिमित्त साताऱ्यात होतोय उत्सव मातृत्वाचा!!
मिलिंदा पवार - सातारा
या हिरकणी महोत्सवामध्ये महाराष्ट्राची हिरकणी पुरस्कार, मॉम अँड किड्स फॅशन शो सातारा, सांस्कृतिक कार्यक्रम, शहराची निर्मिती यावर सँड आर्ट फेस्टिवल हे मुख्य आकर्षण असेल तसेच राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या महिलांना देखील सन्मानित केले जाणार आहे या कार्यक्रमातून जो काही निधी जमा होईल या निधीचा विनियोग कोरोना काळात अचानकपणे कुटुंबाची जबाबदारी पार पडलेल्या एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्याचा मानस हिरकणी फाउंडेशनचा आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कोरोना एकल महिलांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहेत. स्टॉल धारकांसाठी लकी ड्रॉ कूपन चे आयोजन ही करण्यात आले आहे. सर्व सातारकरांनी या महोत्सवातील कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हिरकणी फाउंडेशन च्या संस्थापिका जयश्री शेलार यांनी केले आहे.
उत्सव कलागुणांचा, उत्सव साताऱ्याच्या खाद्यसंस्कृतीचा, उत्सव साताऱ्याच्या हिरकणींचा........