Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव उत्साहात साजरा, वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव उत्साहात साजरा,

वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव  उत्साहात साजरा

 माजी मंत्री आमदार महादेव जानकर,आमदार महेंद्र थोरवे  यांची प्रमुख उपस्थिती 

दत्ता शेडगे - खोपोली

धनगर समाजाचे आराध्यदैवत असलेले वीर हुतात्मा शिंग्रोबा देवाचा उत्सव  1 मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला माजी  पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

   

यावेळीं सकाळी मंदिरात श्रींचा दुधाभिषेक ,होमहवन, आणि सत्यनारायण महापूजा पार पडली, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची सुरुवात जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली करून वाजत गाजत डीजेच्या तालावर भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली, नंतर बोरघाटात ह भ प चंद्रकांत महाराज  वांजळे यांचे कीर्तन पार पडले, दुपारी मान्यवरांचा सत्कार करून महिलांसाठी हलदि कुंकवाचा कार्यक्रम पार पडला, सायंकाळी मंदिरात आरती करून कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माजी मंत्री तथा आमदार महादेव जानकर, आमदार महेंद्र थोरवे, शिंग्रोबा उत्सव कमिटीचे संस्थापक बबन शेडगे, बबन खरात, बाळासाहेब झोरे  बाळासाहेब आखाडे, नामदेव हिरवे, दीपक आखाडे, अध्यक्ष भरत कोकरे, उपाध्यक्ष वाघू कोकरे, खजिनदार बबन जानकर,  सचिव लक्ष्मण बावदानेसदस्य नारायण हिरवे, बापू बावदाने,  एकनाथ घाटे भीमा शिंगाडे, बाळू आखाडे अरविंद गोरे रामदास जानकर, सतीश गोरे  एकनाथ घाटे पांडुरंग झोरे, पुणे जिल्हा परिषद सदस्य गणेश धानिवले, खोपोली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, नगरसेवक मणेश यादव, सुनील पाटील, मोहन औसरमल, हरीश काळे, नगरसेविका प्रमिला सुर्वे, लोणावळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव, ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविनजी काकडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे, ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा अध्यक्ष आनंदराव कचरे, माजी अध्यक्ष रामचंद्र पुकले, रासप कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ढवळे,धनगर समाज सचिव अनंता हिरवे,  भाजपा उत्तर रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा विद्याताई जानकर, लोणावळा भाजपा महिला शहर अध्यक्षा योगिता कोकरे,सरपंच नागेश मरगले,माजी सरपंच  गोविंद कोकरे संजय कोकरे,जेष्ठ नेते धूला कोकरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष बोडेकर, संतोष शिंगाडे नथु ढेबे आदींसह  महाराष्ट्रात भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies