Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वडगाव( उंब्रज) विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकरराव जाधव

 वडगाव( उंब्रज) विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी शंकरराव जाधव 

व्हाइस चेअरमनपदी जयश्री कदम

कुलदीप मोहिते -कराड


           वडगाव( उंब्रज) ता कराड विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी शंकरराव जाधव तर व्हाइस चेअरमन पदी जयश्री कदम यांची बिनविरोध निवड झाली नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक  विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत संभाजी कदम (  आबा )व रणजीत पाटील कार्याध्यक्ष सरपंच परिषद पुणे यांच्या नेतृत्व खाली व मार्गदर्शना खाली एडवोकेट विनायकराव पाटील जनसेवा  पॅनल ने13  जागा  एकतर्फी  जिंकून चाळीस वर्षाची सत्ता कायम राखली 

निवडीसाठी आयोजित निवडणूक  कार्यक्रमात   चेअरमन पदी शंकरराव जाधव तर व्हाइस चेअरमन पदी जयश्री कदम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली मोरे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले तर यावेळी नवनिर्वाचित संचालक रणजीत  कदम  गणेश कदम कृष्णत कदम प्रवीण कदम रामचंद्र कणसे सुदर्शन कदम आनंदराव नलावडे दिनकर  शिले वंत  संगीता पाटील  हसन मुल्ला संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीनंतर  फटाक्यांची अतिषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली दरम्यान सभासदांच्या व सोसायटीच्या विकासासाठी प्राधान्याने पाठपुरावा करणार असल्याचे चेअरमन शंकरराव जाधव यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies