लाचखोर सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र साटम यांच्याकडे सापडले फक्त रोख रक्कम एक हजार नऊशे साठ रुपये
चारचाकी तीन वाहने तर दुचाकी दोन वाहनांसहित सोने चांदी दांगिन्यांचा समावेश
अमुलकुमार जैन -@अलिबाग
रायगड अलिबाग येथील सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी शैलेंद्र अर्जुन साटम यांच्यावर दिनांक ६जून२०२२रोजी रात्री साडे आठच्या सुमारास कार्यालयावर धाड टाकली असता शैलेंद्र साटम यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे काम करण्यासाठी पाच लाख तीस हजार रुपयांची मागणी केली होती.तक्रारदार यांच्याकडून तीस हजार रुपयांची लाच घेताना नवीन मुंबई लाच लुचपत विभागाच्या उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली.या कारवाईत साटम यांच्या कार्यालयाची झाडाझडती केली असता पाच सहा लिफाफ्यात रु.पाच लाख त्रेसष्ट हजार रुपयांची रोख रक्कम सापडली होती.तद्नंतर ठाणे लाच लुचपत विभागाने साटम यांच्या निवासस्थानी छापा टाकून झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे केवळ एक हजार नऊशे साठ रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.त्याचप्रमाणे त्यांच्या निवासस्थानी
रुपये बारा लाख छप्पन्न हजार चारशे किमतीचे घर फर्निचरसह,साटम यांच्या पत्नीच्या नावे टोयोटा कोरोल्ला अल्टीस (एम एच/एफ डब्ल्यू/0005),मारुती सुझुकी सिलेरिओ -( एम एच04/एफ डब्ल्यू/1314),साटम यांच्या नावे रॉयल एनफिल्ड बुलेट (एम एच04/एच जी/7116),साटम यांच्या मुलगी चारू हिच्या नावे ह्युंदाई क्रेटा,होंडा ऍक्टिवा( एम एच04/एफ एल/1314) सापडले असून याव्यतिरिक्त पंचवीस ग्रॅम सोने,दोन किलो चांदी एवढा ऐवज सापडला आहे.अशी माहिती नवी मुंबई लाचलुचपत विभागाकडून मिळाली आहे.
लोकसेवक शैलेंद्र साटम याच्यावर लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाई नंतर ठाणे लाचलुचपत विभागाच्या अधिकारी यांनी त्यांच्या निवासस्थानी झाडाझडती करून हाती फक्त केवळ एक हजार नऊशे साठ रुपयांची रोख रक्कम आणि फक्त पंचविस ग्रॅम सोने सापडणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरत आहे अशी शंका अलिबाग न्यायालयातील वकीलासाहित नागरिक व्यक्त करीत आहेत. साटम यांना लाचलुचपत विभागाचे अधिकारी शिवराज बेंद्रे यांनी न्यायालयात हजर केले तेव्हा तेथील वकीलामध्ये देखील आनंदाची भावना निर्माण झाली होती.काही वकिलांनी सांगितले की साटम हे काही नाही झाले तर पाचशे हजार रुपयांसाठी घेण्यासाठी मागे पुढे बघत नसत.ज्याप्रमाणे लाचलुचपत विभागाने साटम यांच्या निवासस्थानी झाडाझडती घेतली त्याचप्रमाणे त्यांनी त्याचे नातेवाईक तसेच पत्नीच्या माहेरच्या कुटुंबाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येऊ शकते.कारण साटम यांच्या काळ्या पैशाचा व्यवहार त्यांचे जवळचे नातेवाईक करत असल्याची शंकाही व्यक्त केली गेली आहे.ज्यावेळी साटम यांना न्यायालयात हजर केले गेले तरीही त्याच्या चेहऱ्यावर त्याचा घंमडी पणाची मिजास गेली नव्हती. साटम यांच्यावर यापूर्वी पुणे हवेली येथेही लाचलुचपत विभागाने कारवाई केली होती मात्र त्यातून सहीसलामत सुटले असल्याने ते ते निर्दास्त झाले होते. काही शासकीय अधिकारी यांनी सुध्दा काम करण्यास सांगितले तरी ते त्यांच्या माणसाकडे पैशाची मागणी करण्यास मागेपुढे पाहत नव्हते.
शासनाने ज्या अधिकाऱ्यांवर लाच घेताना कारवाई केली आहे त्या अधिकाऱ्यांना परत शासन सेवेत न घेता त्यांची शासन सेवेत येण्यापूर्वी गोपनीय अहवालात जी मालमत्ता दाखवली असते ती सोडून बाकीची सर्व जप्त करून शासनदरबारी जमा करावी आणि त्यास कायमस्वरूपी सेवेतून बेदखल करण्यात यावे,अशी मागणी समाजवादी पक्षाच्या अलिबाग मुरूड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी केली आहे.