Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

विधानसभा निवडणुक

आमदार थोरवे आणि नितीन सावंत यांच्यातच होणार महामुकाबला

निवडणूक विधानसभेची
संतोष दळवी - कर्जत

विधानसभा निवडणुकीला  राज्यात महायुती vs महा  विकास  आघाडी असा सामना रंगतदार  होणार  असून ज्या त्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात झालेली दिसून येते आहे. आरोप प्रत्यारोप यांची एकमेकावर चिखल फेक सुरू झालीय.
विविध पक्ष संघटनाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून महायुतीत जिथे ज्या पक्षाचा आमदार आहे त्या पक्षाला ती जागा सोडली जाणार असल्याचे बोललं जात आहे.मात्र उमेदवार कमजोर होत असेल तर ती जागा मित्र पक्षाला सोडली जाऊ शकते असे ही बोललं जात आहे.दरम्यान कर्जत खालापूरची जागा ही विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे राहू शकते .त्यामुळे आमदार थोरवे यांना त्यांच्या सोबत असणाऱ्या महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवायची आहे तर महविकास आघाडीची जागा ही पूर्वी अखंड शिवसेनेची असल्याने या जागेवर नितीन सावंत हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.अखंड शिवसेनेची दोन शकल्ले झाल्यानंतर नितीन सावंत यांनी उबाठा शिवसेना अबाधित राखल्याचे बोललं जात आहे.नितीन सावंत यांनीही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.नीतिन सावंत यांना त्यांच्याच पक्षातील सुनील पाटील आणि भाई शिंदे यांच्याबरोबर तिकीट मिळवण्यासाठी सामना करावा लागणार आहे.मात्र लोकसभा निवडणूक लढवलेले संजोग वाघेरे यांनी त्यांच्या भाषणात अनेक वेळा नितीन सावंत हे विधानसभेचे उमेदवार असतील असा नामोल्लेख केल्याने सावंत यांनाच ही उमेदवारी जाईल हे जवळजवळ निश्चित मानलं जातंय.तर महायुतीत विद्यमान आमदार थोरवे यांना त्यांच्या पक्षातून कोणीही विरोधक नाही.मात्र अजित पवारांची राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि भाजपचे किरण ठाकरे हे सुध्दा विधानसभा निवडणूक लढवायची यादृष्टीने जोरदार प्रयत्न करत असले तरी ही जागा शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे जाईल हे सुध्दा निश्चित मानलं जातंय.

आमदार महेंद्र थोरवे.

आमदार थोरवे हे मुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात त्यामुळे त्यांनी कर्जत खालापूर कडे जास्तीत जास्त निधी कसा येईल याकडे लक्ष दिले आहे.विकासाचा डोंगर रचल्याने तो भेदण अशक्य आहे.मात्र तुल्यबळ उमेदवार त्यांच्याशी मुकाबला करू शकतो.सावळ्या विठ्ठलाची मूर्ती आणि महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशव्दार बसवून कर्जतकरांबरोबर  इतर कर्जतकडे  येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.गावोगावी रस्ते आणि अनेक विकास विषयक कामे त्यांनी मार्गी लावली असली तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उबाठा गटाचे संजोग वाघेरे यांनी कर्जत विधानसभा मतदार संघात अधिकची अठरा हजार मत घेतल्याने  हा फरक मात्र आमदार थोरवे यांना धडकी भरवणारा आहे.तशात पक्ष फुटीनंतर (शिवसेना आणि राष्ट्रवादी ) ही पहिलीच निवडणूक असल्याने कुठल्या पक्षाची किती मत  हे कमी अधिक फरकाने निश्चित झालं आहे.तसेच मित्र पक्ष राष्ट्रवादी हे छातीठोकपणे सांगत आहेत की नाद करा पण सुनील तटकरे यांचा नाद करू नका त्यामुळे महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जाते.महायुतीचा धर्म पाळला गेल्यास आमदार थोरवे दुसऱ्यांदा आमदार होतील अस बोललं जात. शिवाय आमदार थोरवे यांचा जनसंपर्क दांडगा आहे.तो त्यांना विजयापर्यंत नेणारा ठरेल.

नितीन सावंत

अखंड शिवसेना विखरल्यानंतर उबाठा गटाचे उभारत नेतृत्व आहे.नगरपालिकेत नगरसेवक असलेले नितीन सावंत  यांना शिवसेना फुटीनंतर  चांगला वाव मिळाला .अनेकोत्तम छोटे मोठे कार्यक्रम करून  कर्जत खालापूरकरांच लक्ष वेधून घेत आहेत.उपजिल्हा प्रमुख पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने  आणि लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाला चांगला लीड मिळाल्याने  त्यांचा विश्वास दुणावला आहे.मात्र जनसंपर्काचा अभाव असल्याने ते मतदारापर्यंत पोहचतात  हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी भक्कम असून कितीही कुणीही ठामपणे सांगत असले तरी एका जागेसाठी  अख्ख्या राज्याची युती किंवा आघाडी पणाला लावणं वरिष्ठ नेत्तृत्वला परवणारे नसले तरी आज घडीला या दोघातच खरी लढत होईल आणि ती ही रंगतदार लढत होईल बाकी उरलेले अपक्ष त्यांच्या  अस्थित्वासाठी  कशी लढत देणार हे  पाहणे  येत्या काळात औत्सुक्याचं ठरेल.