विधानपरिषद "लाड"की ?
संतोष दळवी
निवडणूक विधानसभेची
सध्या विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आल्याने महायुती सरकारने अनेकांना खुश करण्यासाठी अनेक लाडकी ,लाडका योजना सुरू केल्या आहेत जसे की लाडकी बहीण,लाडका भाऊ तसेच आता ज्या विविध पक्षातील अनेकांना खेचत भाजपने त्या लोकांसाठी लाडका खासदार ,लाडका आमदार योजना आणली असून पेणचे माजी आमदार धर्यशिल पाटील यांना शेकाप मधून खेचत भाजप मध्ये प्रवेश घेतला मात्र सेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांना भाजपमध्ये खेचलं गेलं.तसेच पेणचे आमदार रवि पाटील आणि प्रशांत ठाकूर यांनाही खेचत रायगड जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी अनेकांना पक्षात खेचून आणल गेलं.मात्र रवि पाटील आणि प्रशांत ठाकूर हे पुन्हादा निवडणूक जिंकल्याने त्यांच्या पुर्नवसनाचा प्रश्न उदभवत नव्हता मात्र धर्यशील पाटील,देवेंद्र साटम आणि सुरेश लाड यांच पुर्नवसन
झालं नव्हतं.त्यातल्या त्यात माजी आमदार धर्यशिल पाटील यांना खासदार करत त्यांचेही अखेर पुर्नवसन झालं.आता सिरीयल प्रमाणे साटम आणि सुरेश लाड यांचे नंबर राहिले असून साटम हे कालांतराने राजकारणाच्या परिघा बाहेर गेल्याने आता उरले माजी आमदार सुरेश लाड,मात्र लाड यांना पक्षात घेऊन बरीच प्रतीक्षा करावी लागली असून आता मात्र त्यांचा नंबर लाडका आमदार होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.भाजपचे कोकणातले भाग्यविधाते मंत्री रविंद्र चव्हाण यांनी तसे संकेत दिले असल्याने लाड यांच्या गोटात आनंद संचारला आहे.राज्यपाल नियुक्त बारा आमदारात माजी आमदार सुरेश लाड यांना संधी देण्याचे बोलल जात आहे. कारण मंत्री चव्हाणांनी लाड साब आप भी कतार में है अस सांगत तसे स्पष्ट संकेत दिलेत.त्यामुळे आता फक्त विधानपरिषदची कतार असल्याने ही माळ सुरेश लाड यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
लाडका आमदार,लाडका खासदार बनवून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा रायगड जिल्ह्यात वाढता प्रभाव पाहता लक्षात घेता भविष्यात खासदार निवडताना सुनील तटकरे यांच्या मतदार संघातील पेण येथील धरीशिल पाटील यांची निवड केली जेणेकरून राष्ट्रवादी पक्षावर भाजपचा वकूब रहावा या दूरदृष्टीने भाजपने हे पुढचं पाऊल उचलल्याचे राजकीय समीक्षकांना वाटतं आहे.तसेच कर्जत विधानसभा मतदार संघात शिंदे गटाचा प्रभाव रोखण्यासाठी माजी आमदार सुरेश लाड यांना विधान परिषदेत पाठवून शिंदे गटाला लगाम लावण्यासाठी ही नियुक्ती होत असल्याचेही बोलल जातं आहे.भाजपची ही दूरदृष्टीची अटकळ मित्र पक्षांच्या मदतीनेच मित्र पक्षांचा उधळलेला वारू रोखण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलल जातं आहे.रायगड जिल्ह्यात शिंदे गट आणि आणि अजित पवार गट यांच्यातून विस्तव जातं नसल्याने या विस्तवावर लाडका खासदार आणि लाडका खासदार बनवून पोळी शेकण्याचा भाजपचा हा अल्पसा प्रयत्न असल्याचं मानलं जातंय.