माकडावर होणार शस्त्रक्रिया !!
माथेरान मधील माकड आपल्या कमरेजवळ अंगावर एक भलामोठा मासा गोळा घेऊन गुजरान करत असताना सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांच्या निदर्शनास ते माकड आले.या दुर्दैवी माकडावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यात यावी साठी त्यांनी वन विभाग आणि सोशल मीडियाचा आधार घेतला. वन विभागाचे अधिकारी आर.जी. आडे यांनी कोकळे यांच्या मागणीला प्रतिसाद देत.बदलापूर येथील नेचर डिझास्टिव्ह रेस्क्यू फाऊंडेशनचे बाळकृष्ण साखरे यांना या बाधित माकडाविषयी माहिती देण्यात आली. साखरे यांच्या पुणे बदलापूर येथून टीम बोलवण्यात आली.माथेरान मधील एका हॉटेल जवळ पिंजरा लावून त्या माकडाला पकडण्यात आल.त्यावर माथेरान मधील पशुसंवर्धन अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून त्याला बदलापूर येथील फाऊंडेशनच्या निगराणी खाली ठेवण्यात आल
आहे.त्यावर उपचार करताना किंवा शस्त्रक्रिया करताना वनविभागाला अवगत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.