महाराष्ट्र मिरर टीम - खोपोली
क्रीडा व युवक सेवासंचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय - रायगड अलिबाग आयोजित जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा २०२४-२५ चे भव्य आयोजन कारमेल कॉन्व्हेन्ट स्कूल खोपोली येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील ३० संघांनी विविध वयो गटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या उदघाटन समारंभा समयी खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, उपमुख्याध्यापिका सिस्टर आयविन, सत्येंद्र यादव,क्रीडा शिक्षिका जयश्री नेमाने. क्रीडा शिक्षिक समीर शिंदे,धनश्री गौडा,अमित थिटे,प्रणय गायकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पोलीस निरीक्षक शीतल राऊत
हे स्वतः विद्यपीठ तथा राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू असून त्यांनी विविध स्तरावर या खेळात नैपुण्य प्राप्त केले आहे. त्यांनी आपल्या मनोगतात या खेळविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन करत खेळातील बारकावे समजावून सांगताना सराव आणि सातत्य हेच यशाचे गमक आहे. खेळाडूने प्रत्यक्ष मैदानावर जाऊन किमान दोन तास खेळायला हवे मोबाईल पासून दूर राहत खेळ आणि अभ्यास याचा योग्य सामन्वय साधला पाहिजे या बाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले.
ही स्पर्धा १४,१७ व १९ वर्ष मुले व मुली अश्या गटात खेळवल्या गेल्या आणि कारमेल स्कूल खोपोलीच्या चारही संघांनी अंतिम फेरी गाठून विजय संपादन केला. विजेत्या संघाची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्व विजेत्यांचे व प्रशिक्षकांचे कारमेलच्या लोकल मॅनेजर सिस्टर मरिना यांनी कौतुक केले.
१४ वर्ष मुली
विजेता-कारमेल स्कूल,खोपोली
उपविजेता- दिल्ली पब्लिक स्कूल,पनवेल
१४ वर्ष मुले
विजेता-कारमेल स्कूल खोपोली
उपविजेता- एल.के.एम स्कूल उरण
१७ वर्ष मुली
विजेता-कारमेल स्कूल खोपोली
उपविजेता- एल.केएम. स्कूल उरण
१७ वर्ष मुली
विजेता-कारमेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली
उपविजेता- एल.के.एम स्कूल उरण
१७ वर्ष मुले
विजेता- दिल्ली पब्लिक स्कूल,पनवेल
उपविजेता- कारमेल स्कूल खोपोली.
१९ वर्ष मुली
विजेता-दिल्ली पब्लिक ज्युनिअर कॉलेज
उपविजेता- जनता ज्युनियर कॉलेज खोपोली
१९ वर्ष मुले.
विजेता- एल.के.एम ज्युनिअर कॉलेज उरण
उपविजेता- व्ही.डी.एम ज्युनिअर कॉलेज खोपोली.