थोरवेंनी काढला तटकरेंचा बाप
वार - पलटवार सुरूच
संतोष दळवी ---- कर्जत
रोह्यात पत्रकारांशी बोलताना आमदार अदिती तटकरेंनी आमदार महेंद्र थोरवे यांना चांगलं सुनावलं असताना आज थोरवे यांनी आदिती तटकरे यांना खडे बोल सुनावले आहेत.
अदिती तटकरे यांनी केलेल्या वार नंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी ही जोरात पलटवार केला.मी 5700 मताधिक्याने निवडून आलो तुमचे आमदार बघा हजार सातशे मतांनी निवडून आलेत.त्या पालकमंत्र्यांना सांगा माझं मताधिक्य घटलं त्यात राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार देऊन मताधिक्य घटलं.ते तुमच्या बापाने केलेलं पाप अशा शब्दात त्यांनी पलटवार केला.
2021 सालापासून रायगडात राष्ट्रवादी vs शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादावर अजूनही पडदा पडायचं नाव येत नसल्याने महायुतीत असलेल्या या धुसफूसचे परिणाम आगामी येणाऱ्या नगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकिंवर झालेले पहायला मिळतील.अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.