Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

प्लाझ्मा थेरपी



*जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात*

*महाराष्ट्र हे प्लाझ्मा थेरपीचा व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य*

*मा. मुख्यमंत्री यांच्या भाषणातील मुद्दे व प्लाझ्मा थेरपीविषयी*  

प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. 

गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. 

आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. 

आपण रडत नाही बसलो , लढतो आहोत. 

एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले. 

ही काही नवीन गोष्ट शोधून काढलेली नाही. १०० वर्षांपासून त्याचा उपयोग होतो आहे. 

आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. 

लशीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात  पण इथे तयार एन्टीबॉडी आपण रुग्णाला देतो आहोत.

रक्ताचा तुटवडा झाल्यावर आपण आवाहन करतो आणि रक्तदाते मोठ्या प्रमाणात पुढे येतात. पण प्लाझ्मा डोनेशनबाबत बऱ्या झालेल्या रुग्णांच्या अंगात अधिक काळजी घ्यावी लागते.

१० पैकी ९ रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. 

प्लाझ्मा बँक तयार करणे आणि ते शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे ही जबाबदारी आपणास पार पाडावी लागेल. 

कधी कधी काखेत कळसा आणि गावाला वळसा असेही होते. 

दीड महिन्यांपूर्वी केंद्रीय टीम येऊन गेली तेव्हा राज्यात कोरोनाची विचित्र परिस्थिती होती, पण आता परवाच ही टीम परत येऊन गेली आणि त्यांनी महाराष्ट्र करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

हे माझे एकट्याचे प्रयत्न नाही. महाराष्ट्र चिवट आहे, प्रयत्न आणि प्रयोग करणारा, धाडसी आहे. मी तुमच्या पाठीशी नाही तर सोबत आहे.   

 *प्लाझ्मा थेरपीविषयी*

महाराष्ट्रात २३ ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये, पालिका रुग्णालये याठिकाणी थेरपीचा वापर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यापैकी १७ ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरु होत आहे. 

ही मोठी उपलब्धता. आपण मध्यम आणि गंभीर रुग्णांवर 

जिथे  केअर नसलेल्या ठिकाणी प्लाझ्मा मशीन मागवत आहोत. संकलित केले जाईल. 

महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही व्यवस्था. 

सीसीसीमधील रुग्ण जे बरे होऊन चालले आहेत तिथे १० दिवसानंतर २८ दिवसाच्या अट दान केले पाहिजे असे आवाहन 

सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लक्ष द्यावे


डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. 

अशा रीतीने प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग सर्वप्रथम 19 व्या शतकात एमिल व्होन बेहरिंग आणि तास्तो शिबासाबूरोव या दोन डॉक्टर्सनी करायचे ठरविले.डायपेथेरीया या जैविक आजारावर याचा प्रयोग करायचे ठरविले.त्याला यश मिळाले तेव्हापासून अशा रीतीने पॅसिव्ह उपचार करणे सुरु झाले.  

एमिल व्होन बेहरिंग यांना जैविक आणि विषाणूजन्य आजारांवर उपचार पद्धतीसाठी नोबेल पारितोषक देखील मिळाले आहे.  

 यासंदर्भात जॉन्स हॉपकिन्सच्या डॉक्टरांनी देखील सांगीतले आहे की, प्लाझ्मा थेरपीचा उपचार रुग्णांना बरे होण्यासाठी प्रभावीरीत्या होताना दिसतो. 

कोरोनाचे संकट सुरु झाल्यावर मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर्सनी अशा प्रकारे प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग करून रुग्णांवर उपचार करण्याचे ठरविले. 

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.

प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील  रक्त घेतलं जातं. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.

जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.

हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा  रुग्ण निवडला जातो.

 आयसीएमआरतर्फे देशभरात प्लाझ्माच्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहेत

 एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण  www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो

संकलन-आदित्य दळवी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies