ना. आदिती तटकरे यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली विविध विषयांवर चर्चा! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, July 27, 2020

ना. आदिती तटकरे यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली विविध विषयांवर चर्चा!

ना. आदिती तटकरे यांच्याशी रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली विविध विषयांवर चर्चा!
 
ओंकार रेळेकर-चिपळूण

चिपळूण दौऱ्यावर आलेल्या ना. आदिती तटकरे यांनी दापोली येथे रेशन दुकानदाराला झालेली मारहाण व शेतकऱ्यांच्या बांधावर खते व भात बियाणे पोहोच करण्यासंदर्भात त्रुटींबाबत रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व चिपळूण खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव कदम यांनी चर्चा केली. यावेळी ना. तत्काळ यांनी या दोन्ही विषयांत लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.                                               राज्यमंत्री उद्योग, खनिकर्म, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार मंत्री ना. आदिती तटकरे या शनिवारी चिपळूण दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तसेच रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार, केरोसीन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष व चिपळूण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अशोकराव कदम, व्यवस्थापक पांडुरंग कामळे यांनीदेखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी अशोकराव कदम यांनी दापोली तालुक्यातील भडवळे येथील रेशन दुकानदाराला झालेल्या मारहाणीची माहिती दिली. तसेच मारेकऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावर ना. तटकरे यांनी रविवारी दापोली दौऱ्यावर असून याप्रकरणी संबंधित प्रशासनाला योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देते, असे सांगितले. तर शासनामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खते, भात बि बियाणे पोच करण्याचे जाहीर केले होते. मात्र, या योजनेतील असलेल्या त्रुटी ना. आदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर ना. तटकरे यांनी जिल्हा कृषी अधिकारी श्री. घोरपडे व तालुका कृषी अधिकारी ढोबळे यांना योग्य त्या सुचना केल्या आहेत, अशी माहिती अशोकराव कदम यांनी दिली.

No comments:

Post a Comment