स्वतः नदीकाठावर जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना दिला धीर - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

स्वतः नदीकाठावर जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना दिला धीर

 स्वतः नदीकाठावर जाऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांना दिला धीर


पालकमंत्री जयंत पाटील सांगलीकरांसाठी ग्राऊंड झिरोवर...

महाराष्ट्र मिरर टीम मुंबई


पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्याचे आणि पुराचे संकट घोंगावत आहे याचा अंदाज येताच पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हयातील नदीकाठच्या गावात पोहोचून नागरिकांना धीर दिला आहे.संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहेत. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेट दिली व संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः माहिती देत धीर दिला.कोरोना असो वा महापूर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील नेहमीच सांगलीकरांच्या मदतीला धावून आले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलयकारी पूर आला होता. त्यावेळीही जयंत पाटील यांनी झोकून देत मदतकार्य केले होते. याशिवाय अन्न वाटप व इतर अत्यावश्यक वस्तूचे वाटप केले होते. ज्यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळीही पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ हालचाली करत प्रशासनाला जनतेच्या सेवेसाठी दाखल करुन घेतले होते. इतकेच नाही जिथे कोरोनाचे रुग्ण आढळले त्या हॉटस्पॉट परिसरातही पालकमंत्री जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर होते. आज संभाव्य पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जयंत पाटील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकले आहेत.

No comments:

Post a Comment