Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

 स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षित अंतर, मास्क, आणि सॅनिटायझर याचा वापर करण्याचे जनतेला आवाहन...

 मिलिंद लोहार-सातारा


 सातारा,   केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपले, आपल्या कुटुंबाचे तसेच समाजाचे रक्षण करावे. कोरोनाचा प्रादुभार्व रोखण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे तसेच सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 73  व्या वर्धापन दिनानिमित जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय  ध्वजारोहण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.  यानंतर त्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावतीने जनतेसाठी शुभसंदेशाचे वाचन केले.  

 ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस गृह रक्षक दलाची मानवंदना स्विकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  या ध्वजारोहण सोहळ्यास  मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपपोलीस अधीक्षक समीर शेख, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

कोरोनाचे संकट आज सगळ्या जगाबरोबर आपल्या देशावर आहे. या कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय बंद झाले यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन मध्ये टप्याटप्याने शिथीलता देवून जीनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर कोरोना संसर्गाचे रुग्ण आज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी 

शेखर सिंह पुढे म्हणाले,  बहुतांश लोक कोणतेही लक्षणे नसलेली किंवा सौम्य लक्षणे असलेली आहेत. पण कोरोनामुळे काही जण दुर्देवाने दगावले आहेत.  मृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहेत.


 कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभाग दिवसरात्र काम करीत आहेत.

सातारा जिल्ह्यात 22 कोविड हॉस्पीटल असून यामध्ये 981 बेड, 20 कोविड हेल्थ  सेंटर असून यामध्ये 851 बेड तर  33 कोरोना केअर सेंटर असून यामध्ये 2 हजार 650 असे एकूण 4 हजार 482 बेड उपलब्ध आहेत. जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित रुग्ण बेड पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. 

सुरुवातीच्या काळात नमुने हे पुणे येथे तपासणीसाठी पाठविले जात होते तेथून रिपोर्ट यायला उशिर होता.   क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात लॅबच्या उभारणीचा  प्रस्तावाला शासनाकडून मान्यता आणि निधीची पूर्तता झाल्यानंतर अत्याधुनिक लॅब सुरु करण्यात आली आहे.   या लॅबममधून  रोज 380 जणांचे नमुने तपासले जाणार असून  यामध्ये आणखीन वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील.  या लॅबमुळे कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा अहवाल 24 तासाच्या आत मिळणार असून रुग्णावर वेळेत उपचार करण्यास मोठी मदत होणार आहे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व जनतेला  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा शेवटी दिल्या

 कर्तव्य बजावर असताना पोलीस दलातील पोलीसांचा मृत्यु झाला होता आज त्यांच्या  कुटुंबींयाना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून कुटुंबींयांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

  कोरोना संसर्ग संकट काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांचाही प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 108 रुग्ण वाहिका सेवा पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  ऊजा सेवा फाऊडेशनच्यावतीने 6 हजार मास्क जिल्हाधिकाऱ्यांकडे सपुर्त करण्यात आले.

या प्रसंगी प्रातांधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies