वातानुकूलित कक्षात बसून कार्य करणाऱ्या अधिकारी याचा कोव्हिडं योद्धा म्हणून सत्कार करण्यापेक्षा प्रत्यक्षात रुग्णासोबत काम करणाऱ्या कर्मचारी हेच खरे कोव्हिडं योद्धा-सारिका माळी-शिंदे यांचे प्रतिपादन - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Saturday, August 1, 2020

वातानुकूलित कक्षात बसून कार्य करणाऱ्या अधिकारी याचा कोव्हिडं योद्धा म्हणून सत्कार करण्यापेक्षा प्रत्यक्षात रुग्णासोबत काम करणाऱ्या कर्मचारी हेच खरे कोव्हिडं योद्धा-सारिका माळी-शिंदे यांचे प्रतिपादन
वातानुकूलित कक्षात बसून कार्य करणाऱ्या अधिकारी याचा कोव्हिडं योद्धा म्हणून सत्कार करण्यापेक्षा प्रत्यक्षात रुग्णासोबत काम करणाऱ्या कर्मचारी हेच खरे कोव्हिडं योद्धा-सारिका माळी-शिंदे यांचे प्रतिपादन

अमूलकुमार जैन-
महाराष्ट्र मिरर मुरुड
वातानुकूलित कक्षात बसून कार्य करणाऱ्या अधिकारी याचा कोव्हिडं योद्धा म्हणून सत्कार करण्यापेक्षा प्रत्यक्षात रुग्णासोबत काम करणाऱ्या कर्मचारी हेच खरे कोव्हिडं योद्धाआहेत असे प्रतिपादन समाजवादी पक्षाच्या अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्षा सारिका माळी शिंदे यांनी अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळे येथील कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये कार्यरत कर्मचारी यांच्या सत्कार प्रसंगी केले.

यावेळी सारिका माळी शिंदे यांनी सांगितले की कोरोना रुग्णांना त्यांच्या नातेवाईक सहित इतर ग्रामस्थ हे त्यांना वाळीत टाकल्याप्रमाणे वागत असतात. त्यावेळी या रुग्णांची काळजी कोव्हिडं केअर सेन्टर मध्ये कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका ह्या आपुलकीने घेत असतात. मात्र याचे श्रेय वातानुकूलित कक्षात बसून फक्त आदेश सोडून त्यांच्या हाताखालील कर्मचारी यांच्याकडून काम करून घेणारे अधिकारी घेत असतात.काही संस्था,मंडळ हे फक्त त्यांचा सत्कार करण्यात धन्यता मानत असते. काही दिवसांपूर्वी एका संघटनेचे ने फक्त जिल्हाधिकारी पासून जिल्ह्यातील प्रत्येक विभागाच्या प्रमुख अधिकारी यांचा कोव्हिडं योद्धा म्हणून सत्कार केला.जे कर्मचारी आत्मीयतेने काम करीत असतात त्यांचा मात्र त्यांना विसर पडतो. म्हणूनच  समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाध्यक्ष अनिल नाईक,अलिबाग तालुका अध्यक्ष अश्रफ घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तळागाळात राहून काम करणाऱ्या कर्मचारी यांचा सत्कार करण्याचे आम्ही ठरविले. त्याची सुरवात आम्ही अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळा येथील कोव्हिडं केअर सेन्टर मधील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यापासून केली आहे.

No comments:

Post a Comment