एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शिक्षक,कर्मचारी वर्गाने साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2020

एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शिक्षक,कर्मचारी वर्गाने साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन

एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोशल डिस्टसिंगचे पालन करीत शिक्षक,कर्मचारी वर्गाने साजरा केला भारतीय स्वातंत्र्य दिन


 बालविद्यार्थ्यांनी पाहिले ऑनलाईन ध्वजारोहण


ओंकार रेळेकर-चिपळूण

आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्रसैनिकांचे योगदान महत्वाचे आहे,आमची मनपासून

ईच्छा आहे . आमच्या स्कूल मधून देशाच्या प्रगतीसाठी 

उच्च पदावर काम करणारे विद्यार्थी घडतील असा विश्वास एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन अमोल चंद्रकांत भोजने 

यांनी व्यक्त केला.

  

चिपळूण शहरालगत कापसाळ येथे असलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये देशाचा ७४ वा स्वातंत्र्यदिन कोरोना संकट काळात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला भाग्यश्री भोजने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,हा संपूर्ण कार्यक्रम स्कूल च्या बालविद्यार्थ्यांनी झूम अँप द्वारे घरात राहूनच ऑनलाईन पाहिला.


       स्कूल च्या शिक्षिका रिना घाग,आदिती वलावटे यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले,या कार्यक्रमाला किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक भूपेश बोंडले,

 पूजा भोजने,भाग्यश्री भोजने, गुणवत्ता अधिकारी नेहा महाडिक,मुख्याध्यापक राकेश भुरण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,ध्वजारोहण आणि छोटेखानी कार्यक्रम शासनाच्या सोशल डिस्टनसिंग चे पालन करून संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे यांनी केले .

No comments:

Post a Comment