रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकरी १९ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 16, 2020

रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकरी १९ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार...

 रिलायन्स इथेन गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकरी १९ ऑगस्ट रोजी  उपोषणाला बसणार...

दिनेश हरपुडे-

महाराष्ट्र मिरर टीम कर्जत


कर्जत तालुक्यातील रिलायन्स इथेन गॅस लाईन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा रिलायन्स व प्रशासनास १५ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता परंतु त्यात कोणताही तोडगा न निघाल्याने शेतकऱ्यांनी एकमताने उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे


कर्जत तालुक्यातील रिलायन्स प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी जिल्हाध्यक्ष, तहसीलदार तसेच रिलायन्स सक्षम अधिकारी यांना आपल्या जमिनीच्या मोब दल्यासाठी शेतकरी १९ ऑगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. प्रकलपग्रस्तांना योग्य तो मोबदला व न्याय मिळावा यासाठी शेतकरी वेळ प्रसंगी अंगावर गुन्हे घ्यायला ही मागे हटणार नाहीत असा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी आपल्या बैठकीत केला आहे.


 गेल्या २ वर्षापासून रिलायन्स प्रशासन आणि सक्षम अधिकारी यांच्यासोबत कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा करत असून प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे देण्यात आली आणि शेतकऱ्यांना फसविले. जो मोबदला शेतकऱ्यांना सांगण्यात आला त्यानुसार जमिनीचा मोबदला दिला नाही तर काही शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहण करूनही आजतागायत कोणताही मोबदला देण्यात आला नाही..गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पात गेलेल्या जमिनीची नासधूस तसेच कोणतेही उत्पन्न घेता येत नाही.. आणि या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आज सर्व शेतकऱ्यांनी कर्जत येथील तहसीलदार  कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.


 रिलायन्स इथेन गॅस दहेज ते नागोठणे पाईपलाईन मध्ये अवसरे, बीरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पंपलोळी आदी गावातील अन्यायग्रस्त शेतकरी आपल्या जमिनीच्या नुकसान भरपाई साठी या लढ्यात सामील झाले असून तहसीदारांसह, जिल्हाधिकारी तसेच सक्षम अधिकारी श्री.पांडुरंग मगदूम यांनाही या बाबत पत्र पाठविण्यात आले आहे. जर येत्या १५ दिवसात या विषयी कोणताही निर्णय झाला नाही त्यामुळे आम्हाला उपोषणा शिवाय कोणताही पर्याय नाही.  


रिलायन्स विरोधात अनेक वेळा पत्रव्यवहार केला असून त्यात लवकरात लवकर मोबदला दिला जाईल असे सांगण्यात आले पण आजतागायत कुठलाही मोबदला आला नाही..आणि बरेचदा उडवा उडविची उत्तरे देण्यात आली. पण आता आमचा न्याय हक्कासाठी गुन्हे अंगावर घेण्याची वेळ आली तरी चालेल पण मग हटायचे नाही असा निर्धार सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.


आमदार तथा उत्तर रायगडचे भाजपा जिल्हाप्रमख प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे नेतृत्व करणारे  कर्जत तालुका सरचिटणीस श्री.राजेश भगत, प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, जनार्दन तरे, प्रल्हाद राणे, सुरेश खाडे,रमेश कालेकर, रोहित राणे, नरेश कालेकर, उमेश राणे, मंगेश तरे, बाळा शेकटे, अमर मोगरे, तुकाराम तरे, दिनकर सोनावळे, सुनिल नारायण शेकटे, वंदना भगवान शेकटे, गणपत बाबरे, तुकाराम काळण, वालकू सोणावळे, पंढरीनाथ सोनावळे, वसंत शेळके, तानाजी हजारे,मुक्ताबाई माळी, शांताराम हडप आदी शेतकरी यावेळी उपोषणाला बसणार आहेत.

No comments:

Post a Comment