पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं ऑटोक्लस्टर, चिंचवड परिसरातील कोविड-१९ रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले‌. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं ऑटोक्लस्टर, चिंचवड परिसरातील कोविड-१९ रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले‌. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं ऑटोक्लस्टर, चिंचवड परिसरातील कोविड-१९ रुग्णालयाचे  लोकार्पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले‌. 

प्रियांका ढम-

महाराष्ट्र मिरर टीम लोणी काळभोर

यावेळी  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  चंद्रकांत दादा पाटील  हे उपस्थित होते महानगरपालिकेनं स्वखर्चानं ह्या रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हा प्रशासन तसंच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. या संकट काळात मानवतेच्या दृष्टीनं सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुध्दची लढाई एकजुटीनं लढल्यास आपण नक्की जिंकू, असा मला विश्वास आहे. नागरिकांना कमी वेळेत, कमी खर्चात उपचार मिळाले पाहिजे, खाटांची कुठेही कमतरता पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. रुग्णांवर उपचारांती जादा देयक आकारणी करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर प्रशासनाची करडी नजर आहे. याकरिता शहरासह ग्रामीण भागात पथकं तयार करून देयकाचे लेखा परीक्षण करण्यात येत आहे. 


कोरोनाविरुध्दच्या लसीची भारतातील पहिली मानवी चाचणी सिरम इन्स्टिट्यूटच्या मदतीनं भारती रुग्णालयात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी लस निर्मिती करण्याच्या दृष्टीनं संशोधन सुरू आहे, ही निश्चितच आशादायी बाब आहे. कोरोनाच्या संकट काळात पोलीस, डॉक्टर, प्रशासन, सेवाभावी संस्था तसंच त्यांचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून अतिशय चांगलं काम करीत आहेत. या लढतीत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना कोरोनाविरुध्दची लढाई जिंकून देश, राज्य कोरोनामुक्त झाल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.No comments:

Post a Comment