सरकारने व्यवस्था वाढवण्यासाठी अत्यंत तातडीने निर्णय घेण्याची गरज. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

सरकारने व्यवस्था वाढवण्यासाठी अत्यंत तातडीने निर्णय घेण्याची गरज. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन


 अतिशय क्रिटिकल स्टेजमध्ये सातारा जिल्हा

  सरकारने व्यवस्था वाढवण्यासाठी अत्यंत तातडीने निर्णय घेण्याची गरज.


       विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस

मिलिंद लोहार-साताराआज सातारा जिल्ह्यामध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आले असताना सातारा सिव्हिल मध्ये त्यांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की साताऱ्यामध्ये  कोरोना पेशंटची संख्या फार वाढत आहे आत्ता इन्फेक्शन रेशो जवळजवळ अठरा टक्के पर्यंत पोहोचला आहे गेल्या आठवड्याचा इन्फेक्शन रेशो जर काढला तर 22 टक्के पर्यंत आहे हे जर थेट एवरेज काढला तर जास्त होतोय ही काळजीची बाब आहे .आपण आता सिव्हील हॉस्पिटलला भेट दिली. त्या ठिकाणी आय सी यु आता फुल आहेत नवीन आयसीयु चालू करण्याचा विचार चालू आहे येथील आयसीयू ची 128 ची कॅपॅसिटी आहे  परंतु 148 रुग्ण आत्ता त्या ठिकाणी आहेत हे तिथे बेड मिळत नाहीत .काही पेशंटचे नातेवाईक व महिला मला भेटल्या बेडची व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात त्यांना करून दिली .मोठ्या प्रमाणात बेडची कमतरता आहे बेडची व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे तसेच येथे एक हेल्थ सेंटर चालू करणे गरजेचे आहे .यासंबंधी कलेक्टर यांच्यासोबत बोललो असताना त्यांनी असे सांगितले की ,"स्टेडियममध्ये एक हेल्थ सेंटर चालू करण्यासाठी प्रस्ताव गेलाय हा प्रस्ताव तात्काळ मंजूर झाला पाहिजे एवढ्या दिवस हा प्रस्ताव प्रलंबित राहणे योग्य नाही .ज्या झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि ती वाढत असताना ए सिम्प्टटोमॅटिक सोबत क्रिटिकल पेशंटची संख्या देखील मोठी आहे हे क्रिटिकल पेशंट्सच्या मॅनेजमेंट करता ऑक्सीजननेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटर लागतील त्याकरीता जे काही चारशे बेडची व्यवस्था प्रपोज केली .मी सरकारला विनंती करतो की ,तात्काळ त्याला मान्यता द्यावी नाहीतर खूप मोठा प्रश्न निर्माण होईल लोक भटकत राहतील .आरटीपीसीआर ची क्षमता वाढवणे गरजेचे आहे  असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .त्यानंतर पुढे बोलताना यांनी सांगितले की आत्ता साधारणपणे 270 बेडची संख्या आहे हे आपण पुण्याची क्षमता पकडून ही पाचशेच्या वर जात नाही आता जर आपण बघितले rt-pcr व जो काही रॅपिड एंटीजन करावा लागेल 1000 पर्यंत नेल्याशिवाय इन्फेक्शन रेशिओ तो आपण कमी करू शकणार नाही त्यादृष्टीने लक्ष देण्याची गरज आहे एका अतिशय क्रिटिकल स्टेजमध्ये सातारा जिल्हा आहे कोरोना पेशंटची वाढही पुढे होणार आहे हे इन्फेक्शन रेशिओ वाढतोय तात्काळ सरकारच्या वतीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे मी स्वतः येथून गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे ह्या व्यवस्था येथे उभ्या कराव्यात.

No comments:

Post a Comment