Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही !! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

 

देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही !!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मिलिंद लोहार-सातारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना  काही वेगवेगळ्या समस्यांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तरे दिली 


साताऱ्यातील ही अशी परिस्थिती असल्यानंतर प्रार्थनास्थळे उघडावीत का?

यावर बोलताना त्यांनी सांगितले की दारू दुकाने उघडता मॉल उघडता संपूर्ण देशा मध्ये सर्व राज्यात सर्व काही ओपन आहे

(देशापेक्षा महाराष्ट्र वेगळा नाही)


दारू दुकाने उघडताना तर मंदिरे उघडायला काय हरकत  ?लोकांची मागणी असेल तर उघडा असेही यावेळी विरोधी पक्षनेते ते देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.


त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की मुश्रीफांनी दोन मागण्या केल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय बोलाल

 पहिली मागणी

मजबुती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा?

दुसरी मागणी

 आलम पट्टी धरणाची पाच फूट उंची वाढवू नये?

याबद्दल बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले मुश्रीफांना  माझ्यावर खूप विश्वास आहे मुश्रीफ  यांनी  हे लक्षात घ्यायला हवे हे त्या गावातील पुतळा काँग्रेसच्या आमदारांनी अडवला त्यांनी तो लावून दिला नाही .जे काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष आहेत तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगण्याऐवजी आपल्या सहकारी पक्षाला का सांगता आणि महाराजांच्या पुतळयाकरिता आवश्यकता असेल तेथे जाऊन आम्ही आंदोलन करू ,असा टोलाही त्यांनी लगावला.


त्याच प्रकारे अलमट्टीच्या संदर्भात त्याची उंची वाढवू शकत नाही अलमट्टीची आताची उंचीही ही महाराष्ट्राला मान्य नाही त्यावेळी आमच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवा होता तो घेतला गेला नाही त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे आहे असे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies