नेरळ माथेरान टॅक्सी चालकांना हवाय मदतीचा हात !!
दिगंबर चंदने -नेरळ
मार्च महिन्यापासून सरकारने जाहीर केलेल्या लाॅकङाऊनमुळे माथेरानचे पर्यटन बंद आहे .त्यावर अवलंबून असणाऱ्या टॅक्सी चालकांची व्यवसाय बंद असल्याने उपास मार होत आहे .या टॅक्सी चालकांना शासनाने मदत करावी अशी मागणी टॅक्सी चालक मालक युनियनचे अध्यक्ष संतोष शेळके यांनी केली आहे
गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माथेरान पर्यटकांसाठी बंद केले असल्याने केवळ पर्यटनावर अंवलुबून असेल्या नेरळ- माथेरान टॅक्सी चालकांचा व्यसाय बंद असल्याने यावर उदरनिर्वाह करत असेल्या सुमारे 260 टॅक्सी चालकांचा रोजगार बंद असल्याने उपास मारीची वेळ आली असल्याची भावना टॅक्सी युनियन चे अध्यक्ष संतोष शेळके यांनी व्यकत केली गेल्या पाच महिन्यापासून टॅक्सी सेवा बंद आहे तसेच ती केव्हा सुरू होईल या बाबत शाश्वती नाही तसेच शासनाने माथेरान चालू करण्याचा जरी निर्णय घेतला तरी सामान्यांकरिता रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता नाही त्यामुळे पर्यंटक माथेरानला येतील याची ही शाश्वती नाही मग आम्ही कुंटूब चालवायची कशी तसेच तीन महिन्यापुर्वी रिलायन्स फाॅऊङेशन तर्फे मदतीचा हात दिला होता त्यांनतर मात्र कुठलही मदत मिळाली नाही तरी व्यवसाय पुर्व पदावर येईपर्यंत शासनाने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे