मुरबाड मधील दोन तरुणांचा खोपिवली येथिल धबधब्यात बुडुन मृत्यु.. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

मुरबाड मधील दोन तरुणांचा खोपिवली येथिल धबधब्यात बुडुन मृत्यु..

 मुरबाड मधील दोन तरुणांचा खोपिवली येथिल धबधब्यात बुडुन मृत्यु..


प्रयत्नांची पराकष्टा करून  प्रेते काढली बाहेर.

 महाराष्ट्र मिरर टीम -मुरबाड


*ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील आंबेळे गडगे येथिल सहा तरुण फिरण्यासाठी देहरी खोपिवली येथिल धबधब्यावर गेले होते. दोन दिवसापासुन पावसाचे प्रमाण वाढले असल्याने डोंगरावरुन मोठया प्रमाणात पाणी वहात होते.  खोपिवली गावाच्या मागे चोंडीची धार म्हणुन ओळखल्या जाणा-या धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तोल गेल्याने खोल पाण्यात पडुन  मृत्यू झाला होता*


उमेश बोटकुंडले वय (२५) कार्तिक (बबल्या) गडगे वय (२५)  मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत


शहापूर ठाणे येथील जीवरक्षक फाऊंडेशन आणि खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने  मदतकार्यासाठी पाचारण केले होते.


अत्यंत बिकट परिस्थितीत या दोन्ही टीमच्या सदस्यांनी धो धो पाऊस कोसळत असताना आणि पाण्याने रौद्ररूप धारण केलेले असताना त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. प्रयत्नांची शिकस्त केल्यानंतर शव बाहेर काढण्यात टीमला यश आले आहे. समीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, मुकुंद भगत, विजय भोसले, अमोल कदम हनिफ कर्जीकर यांनी या टास्कवर  यशस्वीरित्या  काम केले.

मानव अधिकार टीम -  आंबेळे खुर्द,  मुरबाडचे  सुभाष गडगे, नारायण गीते , सदा गडगे यानी या प्रसंगी मोलाचे सहकार्य केले आहे. मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे साहेबांनी सर्व रेस्क्यू टीमचे कौतुक करून आभार मानले.

No comments:

Post a Comment