चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र प्रकल्पग्रस्तांसाठी पालकमंत्र्यांची शिष्टाई! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र प्रकल्पग्रस्तांसाठी पालकमंत्र्यांची शिष्टाई!

 

चंद्रपूर औष्णिक वीज केंद्र प्रकल्पग्रस्तांसाठी पालकमंत्र्यांची शिष्टाई!

महाराष्ट्र मिरर टीम -चंद्रपूरचंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या चिमणी वर चढलेले ७ प्रकल्पग्रस्त १० दिवसांच्या आंदोलनानंतर  सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खाली उतरले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सिटीपीएस विश्रामगृहावर ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांची लवकरच ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यामध्ये यासंदर्भात अंतिम तोडगा निघणार आहे. 

तथापि,या वेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment