माजी मंत्री आ.भास्कर जाधव यांच्या तुरंबव निवासस्‍थानी उमलली एकाच वेळी १७ ब्रह्मकमळ - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 28, 2020

माजी मंत्री आ.भास्कर जाधव यांच्या तुरंबव निवासस्‍थानी उमलली एकाच वेळी १७ ब्रह्मकमळ

 माजी मंत्री आ.भास्कर जाधव यांच्या तुरंबव निवासस्‍थानी उमलली एकाच वेळी १७ ब्रह्मकमळ


ओंकार रेळेकर-चिपळूणब्रह्मकमळ हे अत्यंत दुर्मिळ असं फूल असून ते उगवणं शुभ मानलं जातं. ब्रह्मकमळ उमलल्याच्या बातम्या आपल्याला अधूनमधून ऐकावयास आणि पहावयास मिळतात. एक फुल येणे देखील आश्चर्यकारक असते, अशावेळी आमदार भास्करराव जाधव यांच्या तुरंबव येथील निवासस्थानी काल (गुरुवारी) रात्री तब्बल १७ ब्रह्मकमळे उमलली. गणपतीनिमित्त आ.जाधव यांचे संपूर्ण कुटुंबीय तुरंबव येथे असून सर्वांनी या ब्रह्मकमळाचे विधिवत पूजन केले. एवढेच नाही तर या फुलांच्या हाराने त्यांच्या घरच्या गणपतीची मूर्तीही सजली.. त्याच हे छायाचित्र....

No comments:

Post a Comment