महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना न्याय द्या
तरुणांमधून आक्रोश, बस्स झाला आता ई पास!!
परप्रांतीयांना महाराष्ट्रात यायला परवानगी मात्र आम्हाला का नाही संतप्त तरुणांचा सरकारला सवाल
मिलिंद लोहार
महाराष्ट्र मिरर टीम सातारा

सध्या परिस्थिती कोरोना संसर्गाच्या महामारी मुळे सरकारने ठोस पावले उचलली मात्र या ठोस पावला बरोबरच काही उणिवाही दिसायला लागल्या जसे की ई पास सरकारने चौथे लॉक डाऊन शिथिल केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने गणेशोत्सव काळासाठी एसटी बसेस ला ई पास चे नियम कोणत्याही प्रकारे असणार नाहीत असे सांगितले व प्रायव्हेट गाड्यांसाठी वेगळे नियम प्रायव्हेट गाड्यांना पास असावा अशी सरकारची भूमिका मात्र बाहेर राज्यातून येणारे लोंढे हे सरकार रोखू शकले नाही व आपल्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांचे रोजगार मिळवण्यासाठी भूमिपुत्रांना तुम्ही लॉक डाऊन स्वरूपाने थांबवले आहे कसे मिळणार तरुणांना रोजगार सध्यास्थितीत आई-वडिलांच्या जीवावर जगणारे तरुन 80 टक्के झाले घरामध्ये वाद-विवाद सुरू झाले आहेत . तरुणवर्ग काहीतरी विचित्र विचार करणार तर नाही ना ?हे होण्याआधीच काहीतरी विचार करा कोरोना काळामुळे मुंबई पुणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर नाशिक औरंगाबाद धुळे अशा महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून तरुण वर्ग व जो मेट्रो शहरांमध्ये राहत होता कोरोना संसर्गाच्या महामारी मुळे गेले सहा महिने आपल्या घरीच राहत आहे मात्र प्रत्येक मुलाचे आई-वडील हे श्रीमंत असतील असे नाही ना प्रत्येक तरुणाच्या आई वडील आपला उदरनिर्वाह कसे करत असतील मात्र ज्यांना आता नोकरीसाठी परत आपल्या शहरांमध्ये जायचे आहे त्यांना जाता येत नाही सरकारने घातलेल्या काही अटी याच्यात काही तथ्य आहे का याचा विचार करावा तरुण वर्ग पुन्हा आपापल्या कामाला माघारी जाण्याच्या तयारीत आहे केंद्र शासनानेही चौथ्या लोक डाऊन मुळे शिथिलता दिली आहे मात्र राज्य सरकारने ही ही शीतलता द्यावी व ई पास बंद करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे मात्र सरकारच्या धोरणामुळे तरुणवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे मात्र परप्रांतीय लोंढे रेल्वे भरून भरून येत आहेत त्यांच्यावर का नाही चाप लावत असा प्रश्न तरुणवर्ग विचारत आहे योग्य वेळी त्यांच्यावर चाप लावला असता तर भूमिपुत्रां शिवाय कोणत्याही कंपन्यांना पर्याय नसतात एमआयडीसी मध्ये सुद्धा परप्रांतीयांना विमानाने आणले जात आहे त्यांच्याकडे तुमचे लक्ष आहे का बास झाला आता ई पास अशी सर्वसामान्य नागरिकांमधून बोलले जात आहे
