जय हनुमान ट्रस्ट कडून कोरोना योद्धा सन्मापत्र वाटप - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, August 15, 2020

जय हनुमान ट्रस्ट कडून कोरोना योद्धा सन्मापत्र वाटप


जय हनुमान ट्रस्ट कडून कोरोना योद्धा सन्मापत्र वाटप 

सुधीर पाटील-सांगली

तासगाव तालुक्यातील निमणी पाचवा मैल येथील जय हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट यांचेकडून कोरोना महामारी च्या काळात ज्या व्यक्तीने आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र जनतेसाठी सेवा कार्य केले.अशा व्यक्तींना आज स्वातंत्र्य दिनादिवशी कोव्हिड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यामध्ये तासगाव पोलीस उपनिरीक्षक पंकज पवार ,गोपनीय शाखा मोहन मुंडे, रमेश ओमासे,विलास मोहिते ,येळावी बीटचे संजय माने , शिवसेना तालुकाप्रमुख अमोल काळे ,नगरसेवक अभिजीत माळी ,येळावी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉक्टर चौगुले,निमणी सरपंच ,आशा सेविका ,आरोग्य सेविका, रेशन दुकानदार, सामाजिक कार्यकर्ते,यांना सन्मानित करण्यात आले .यावेळी  ट्रस्टचे अध्यक्ष विनय सपकाळ, संजय मोरे , बंडा शिरदाळे , लखन वाघमारे ,राजू पाटील, राहुल वाघमारे ,चैतन्य सपकाळ, आदि उपास्थित होते .

No comments:

Post a Comment