दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, August 23, 2020

दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

 दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे    भक्तिमय वातावरणात विसर्जन


गळतीचा राजाचे भक्तीमय वातावरणात  विसर्जन


चंद्रकांत सुतार--माथेरान माथेरान मध्ये आज घरगुती  आणि सार्वजनिक दीड दिवसाचे एकूनव28 गणपतीचे  भक्ती मय वातावरणात विसर्जन  करण्यात आले , कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र शांततामय वातावरणात  गणपती सण साजरा करण्यात आला ,  स्वतःची सुरक्षा बरोबर संपूर्ण गावाचीच सुरक्षितता लक्षता घेऊन प्रशासनाने अनेक नियम , निर्भन्ध लावले होते, त्यास सर्व नागरिकांनी  उस्फूर्त  पाठिबा  सहकार्य देत गणेशोस्तव सण साजरा केला, संपुर्ण तालुक्यातील एकमेव  दीड दिवसाचा  सार्वजनीक गणपती हा माथेरान येथील विक्रात युवक मंडळाचा  *गळतीचा राजा* ,मागील 40  वर्षापासून हे मंडळ आपला गणेशोस्तव सण दीड दिवसाचा साजरा करत असताना  इतर सामजिक कार्य करत आहेत आज कोरोनाच्या परिस्थिती  सर्व नियमानचे पालन करत  दीड दिवस सेवा करून आज भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचे  विसर्जन केले , मुख्याधिकारी प्रशांत जाधव नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, एपीआय प्रशांत काळे साहेब  कर्मचारी वर्ग  विसर्जन ठिकाणी सर्व परिस्तिथी वर  नियंत्रण करत होते,  संपूर्ण जगावर  कोरोना चे संकट आले आहे ते दूर होण्यासाठी साकडे घालून लवकरच माथेरान पूर्वी प्रमाणे हिरवेगार हसते खेळत होऊंदे असे साकडे विक्रात युवक मंडळाच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाकडे   घालण्यात आले .

No comments:

Post a Comment