सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला धरणाच्या पाणी पातळीत वाढ. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, August 14, 2020

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला धरणाच्या पाणी पातळीत वाढ.सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला धरणाच्या पाणी पातळीत वाढ.

कोयना धरणात आजपासून विसर्ग !!..

कुलदीप मोहिते-कराड


कोयना धरणामध्ये प्रतिसेकंद सरासरी 50 हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 80 टीएमसी इतका झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे त्यामुळेच वीजनिर्मिती करून धरणाच्या पायथा गृहातून पाणी सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाअसून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कोयना धरण अंतर्गत विभागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे धरण पायथा वीज गृहातील दोन द्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 21 क्‍युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment