दीपस्तंभ शिवशंभु सामाजिक संस्था { खुटल - रोहा } यांच्यातर्फे चणेरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 26, 2020

दीपस्तंभ शिवशंभु सामाजिक संस्था { खुटल - रोहा } यांच्यातर्फे चणेरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान...

 दीपस्तंभ शिवशंभु सामाजिक संस्था  खुटल - रोहा  यांच्यातर्फे चणेरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान...


सत्यप्रसाद आडाव -चणेरा -रोहा
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने ''दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्थेतर्फे" रक्तपेढी रायगड जिल्हा रुग्णालय अलिबाग डॉक्टर दीपक गोसावी, सुनील बंदीछोडे ,प्रज्ञा पवार, संकेत घरात ,महेश घाडगे या टीमच्या सहकार्याने कुणबी समाज हॉल चणेरा रोहा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 


दानाचे परंपरा भारतामध्ये या पूर्वीपासून आहे. कवचकुंडले देणारा दानशूर कर्ण असो किंवा स्वप्नात वचन दिल्याप्रमाणे दान देणारा राजा हरिश्चंद्र असो ,महा दानाची परंपरा भारताला लाभली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून ते एक असं कार्य आहे की ज्याचे पुण्य तर मिळतेच आणि रक्तदात्यांना शारीरिक फायदे होतात.  रक्तदानाचे थेट संबंध मरणाशी येतो जर एका माणसाने रक्तदान केलं तर तो चार जणांचे प्राण वाचू शकतो. गुंतागुंतीची शस्त्रकिया असतील, प्रसूतीच्या काळात मध्ये प्रसूती होताना रक्ताची गरज ,अपघात असतील या सर्व आजारांना रक्त दिल्याशिवाय त्यांचे प्राण वाचू शकत नाही.

दीपस्तंभ शिवशंभो सामाजिक संस्था खुटल रोहा कोर कमिटी संतोष भोईर संस्थापक अध्यक्ष, महादेव मोरे उपाध्यक्ष, सुरेश उपाध्यक्ष ,संदीप कुदळे सचिव, मयूर विचारे सहसचिव, राजेश घोसाळकर, खजिनदार  सर्व कमिटीने  परिश्रम घेऊन रक्तदान शिबिर पार पडले.

No comments:

Post a Comment