गाव चावडी पत्रे चोरी,ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण. - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

गाव चावडी पत्रे चोरी,ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण.


गाव चावडी पत्रे चोरी,ग्रामपंचायत सदस्यांचे उपोषण.

निरंजन पाटील-कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी गावचावडी वरील पत्रे चोरी प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर यांच्या सह अकरा सदस्यांनी आज तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. आज सकाळी दहा वाजता उपोषणाला सुरूवात झाली.मात्र गटविकास अधिकारी अजित देसाई यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. 

गारगोटी तील गावभागात सरकारी गावचावडी आहे.गावचावडी मोडकळीस आल्याने निर्लेखनाचा ठराव पंचायत समिती स पाठवला मात्र त्याअगोदरच चावडीवरील पत्रे गायब झाले.


   पत्रे गायब झाल्याने त्याचा शोध घेवून पत्रे चोरावर गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना सादर करून लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर यांच्यासह सदस्यांनी दिला. दुपारी एक वाजता गटविकास अधिकारी देसाई यांनी उपोषण स्थळाला भेट देवून चार दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. 

यावेळी विरोधी गटानेही उपोषण केले गारगोटी गावचावडी च सरपंच संदेश भोपळे यांनी चोरली असून व त्याचा बनाव करून विरोधी सदस्यांना बदनाम करत आहेत त्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी देखील पंचायत समिती समोर उपोषणाला बसले .गारगोटी ग्रामपंचायतीमध्ये ढिसाळ कारभार सुरू असुन त्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी लाक्षणिक उपोषण केले.सरपंच संदेश भोपळे व अजित चौगुले यांची रेकाॅर्डिंग क्लिप गटविकास अधिकारी देसाई यांना ऐकवण्यात आली,तर देसाई यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

तुंबळ घोषणाबाजी.....दोन्ही गटाच्या सदस्यांनी  जोरदार एकमेकाविरूध्द जोरदार घोषणाबाजी सुरू केली वातावरण तापण्यास सुरूवात झाल्याने पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी तात्काळ धाव घेवून ग्रामपंचायत सदस्याव्यतिरिक्त सर्व परिसरातील जमाव पांगवला व दोन्ही मंडळातील ध्वनिक्षेपक ताब्यात घेतले. 


 

No comments:

Post a Comment