DCPS धारक शिक्षकांच्या अंशदान रकमेत शासन हिस्सा व व्याज जमा करूनच खाती NPS मध्ये वर्ग करावीत- विनायक शिंदे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Monday, August 17, 2020

DCPS धारक शिक्षकांच्या अंशदान रकमेत शासन हिस्सा व व्याज जमा करूनच खाती NPS मध्ये वर्ग करावीत- विनायक शिंदे

 DCPS धारक शिक्षकांच्या अंशदान रकमेत शासन हिस्सा व व्याज जमा करूनच खाती NPS मध्ये वर्ग करावीत- विनायक शिंदे


उमेश पाटील -सांगली


  परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना( DCPS).केंद्राच्या राष्ट्रीय वेतन निवृत्ती योजनेमध्ये(NPS) समाविष्ट करणेबाबत शासन स्तरावरून अंमलबजावणी सुरू आहे.  परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना( DCPS) सुरू झाल्यापासून शिक्षकांच्या पगारातून 10%अंशदान रक्कम कपात होत आहे.त्यामध्ये शासन  हिस्सा अद्यापही जमा झाला नाही.दरवर्षी ह्या हिशोबाचे तक्ते अंशदान कपात,शासन हिस्सा व व्याज या सर्व बाबींसह अचूक देण्याची मागणी केली जाते पण कार्यालयाप्रमुखांनी म्हणावे तेवढे हा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही.

   वारंवार शिक्षकांच्या पगारातून कपात झालेल्या रकमेचाच हिशोब मागितला जातो पण जि प मध्ये कपात होऊन जमा झालेल्या रकमेचा हिशोब अद्यापही बिनचूक मिळालेला नाही. Nps चा फाँर्म  भरून घेण्यापूर्वी शिक्षण विभागाने व अर्थ विभागाने DCPS शिक्षकांची  पगारातून कपात झालेली रक्कम,शासन हिस्सा ,व्याजासहित जमा झालेले अचूक तक्ते प्रशासनाकडून तात्काळ द्यावेत  

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा DCPS खाती NPS मध्ये वर्ग करण्यास विरोधच असून या DCPS धारक शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी यासाठी नेते मा संभाजीराव थोरात यांचे नेतृत्वाखाली मा शरदचंद्रजी पवार,मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे,अर्थमंत्री मा अजितदादा पवार यांची भेट घेऊन प्रयत्न केले जाणार आहेत. सद्याची कोरोना परिस्थिती थोडीशी आटोक्यात आल्यानंतर या प्रश्नासाठी शासन स्तरावर जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. शिक्षकांचे अचूक तक्ते तात्काळ द्यावेत अशी मागणी मा मुख्यकार्यकारी अधिकारी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांचेकडे करण्यात आली असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे व अविनाश गुरव यांनी दिली.

No comments:

Post a Comment