कोरेगाव मतदार संघात वैयक्तिक 100 बेडचे सुसज्ज कोवीड सेंटर उभारणार :आमदार महेश शिंदे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Sunday, September 13, 2020

कोरेगाव मतदार संघात वैयक्तिक 100 बेडचे सुसज्ज कोवीड सेंटर उभारणार :आमदार महेश शिंदे

 कोरेगाव मतदार संघात वैयक्तिक 100 बेडचे सुसज्ज कोवीड सेंटर उभारणार :आमदार महेश शिंदे 


प्रतीक मिसाळ-कोरेगावकोरेगाव तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरु असून आत्तापर्यंत 37 जणांचे कोरोनाने बळी घेतले आहेत . दररोज साधारणतः नव्वद ते शंभर नवीन पॉझिटीव वाढती रुग्ण संख्या पाहता नागरिकांच्या आरोग्यासाठी वैयक्तिकरित्या जितराज मंगल कार्यालयात ऑक्सीजनसह सर्व सुविधायुक्त 75 बेड व 25 साध्या बेडचे कोवीड सेंटरची उभारणी करणार असल्याचे प्रतिपादन आ महेश शिंदे यांनी केले . ते कोरेगाव येथे विश्राम गृहात कोरोना संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते . यावेळी प्रभारी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला तहसिलदार रोहिणी शिंदे , गट विकास अधिकारी क्रांती बोराटे , कोरेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी विजया घाडगे , ना तहसिलदार सुयोग बेंद्रे , प्रभारी ना तहसिलदार विठ्ठलराव काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र जाधव , कोरेगाव ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ युवराज करपे , डॉ संजय चिवटे उपस्थित होते . आ महेश शिंदे पुढे म्हणाले की , साधारणतः शंभर बेडच्या कोवीड सेंटरसाठी खाजगी दोन फिजीशियन , 20 प्रशिक्षित नर्स व स्टाफची नेमणुक करण्यात येणार आहे.याठिकाणी अत्याधुनिक वैद्यकीय साधन सामुग्री , ऑक्सीजन सिलेंडर यासह अत्यावश्यक आरोग्य कीट उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत तसेच शववाहिका उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले . तसेच दिवसेंदिवस वाढती रुग्ण संख्या पाहता कोरेगाव ग्रामीण रुग्णालय कोवीड सेंटरमद्ये सध्या 30 बेडची असणारी क्षमता वाढविणे गरजेचे असून नागरिकांचे आरोग्य हीत पाहता तात्काळ ऑक्सीजनसह सुसज्ज आणखी 15 बेड वाढविण्याचे आदेश दिले . तसेच कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून कार्यरत असलेले वैद्यकिय अधिकारी , आशाताई , अंगणवाडी सेविका यांना उपचारासाठी राखीव बेड ठेवण्याची सुचना आ महेश शिंदे यांनी आवर्जून दिल्या . तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र जाधव यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आणखी विलगीकरण कक्ष उभारुन त्याठिकाणी जंबो ऑक्सीजन सिलेंडर व ईसीजी मशिनच्या केलेल्या मागणीला दुजोरा देत त्यांनी 150 बेडचे सरस्वती हायस्कुल अथवा सुरक्षित ठिकाणी सीसीसी सेंटर तयार करण्याच्या सुचना दिल्या .  कोरेगाव आरोग्य विभागाने कोरोना महामारीत चांगली कामगिरी केली असून सर्व माहिती सॉफ्टवेअर द्वारे अपडेट ठेवली आहे . त्यामुळे कोरोना रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी कंट्रोल रुमची निर्मिती करणे नितांत गरजेचे आहे . यामुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात कोण कोणत्या हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती उपलब्ध झाल्याने रुग्णासह कुटुंबियांची होणारी गैरसोय दूर होईल .आशा भावना यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केल्या.लोकांनी या आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेऊन यावर मात करावी.असे आवाहनही त्यांनी केले.


No comments:

Post a Comment