Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कराड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 62 गावांमधील बत्तीगुल

 कराड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस 62 गावांमधील बत्तीगुल


कुलदीप मोहिते -कराड


रविवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपून काढल्याने वीज पुरवठा यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या मसूर, उंब्रजसह ६२ गावांमध्ये जवळपास १६ तास बत्ती गुल झाली. त्यामुळे लोकांना अख्खी रात्र काळोखात काढावी लागली. तसेच मोबाईलचे चार्जिंग संपून गेल्याने ऑनलाईन शिक्षणाचाही बट्ट्याबोळ झाला.


रविवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते. असह्य उकाडा जाणवत होता. रात्री आठच्या सुमारास वादळवारे यासह व विजांच्या कडकडाटासह कराडसह उत्तर भागाला पावसाने झोडपून काढले. रात्री उशीरापर्यंत जोरदार पाऊस कोसळत होता. विजांच्या तांडवामुळे ३३ केव्ही लाईनवरील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान होऊन रात्री साडेआठच्या सुमारास मसूर, उंब्रज, चाफळ, चरेगाव, इंदोलीसह जवळपास ६२ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. 


नेहमीप्रमाणे थोड्या वेळात पुन्हा वीज येईल म्हणून लोकांनी वाट पाहिली. पण संपूर्ण रात्र काळोखात गेली. पंखे व ‘गुड नाईट’ बंद राहिल्याने डासांचा उपद्रव वाढून ‘बॅड नाईट’ झाली. कित्येकांच्या मोबाईलचे चार्जिंग संपून गेल्याने संपर्क यंत्रणा कोलमडली. रात्री गेलेली वीज दुपारी साडेबाराच्या सुमारास आली. दरम्यानच्या काळात मोबाईलवर चालणारे ऑनलाईन वर्ग मुलांना जॉईन करता आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले.


तथापि, वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांनी रात्रीसुध्दा जिगरबाजपणे यंत्रणेतील बिघाड शोधून दुरूस्तीचे काम केले. सकाळपासून या कामाला गती आली. त्यांच्या कामामुळे निदान साडेबारा वाजता वीजपुरवठा पूर्ववत होऊ शकला. त्याबद्दल लोकांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies