Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्र्यांची पाटण तालुक्याला मदत

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्र्यांची पाटण तालुक्याला मदत


हेमंत पाटील -सातारा (पाटण) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मदतीने पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे माध्यमातून पाटण मतदारसंघातील सुमारे 325 गांवागांवात तसेच वाडयावस्त्यांवर 500 टेंम्प्रेजर मशीन,आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या तसेच मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कोरोना बाधित रुग्णांची उपचाराकरीता ने-आण करणारे कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे सुरुवातीपासूनच पाटण मतदारसंघात सतर्क राहून गेली 06 महिन्यापासून कार्यरत आहेत.मतदारसंघात कोरोनाचा प्रार्दुभाव ज्या-ज्या ठिकाणी झाला त्या गांवाना,वाडयावस्त्यांना भेटी देण्याची तसेच तेथील नागरिकांच्या लॉकडाऊन काळातील समस्या सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात त्यांनी मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणेला बरोबर ठेवत प्राधान्याने मोहिम हातात घेतली. मतदारसंघाबरोबर सातारा जिल्हयातील सर्व तालुक्यांतील प्रमुख ठिकाणांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भेटी देत तेथील कोरोनाच्या अनुषंगानेच्या समस्या सोडविण्यासंदर्भातही त्यांनी मागील 06 महिन्यांच्या काळात भर दिला. पहिल्या टप्प्याचे लॉकडाऊन सुरु होताच पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 21 हजार कुटुंबांना एक-एक महिना पुरेल एवढे धान्य, संसारपयोगी साहित्य त्यांनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने मतदारसंघात वाटप केले.

            दोनच दिवसापुर्वी शंभूराज देसाईंनी शिवसेना पक्षाच्या तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून पाटण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 325 गावे व वाडयावस्त्यांमध्ये ग्रामीण जनते पर्यंत तापाची तपासणी करणेकरीता 500 टेंम्प्रेजर मशीन,रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम गोळयांच्या 4000 हजार डब्या, च्यवनप्राश डबे त्याचबरोबर मतदारसंघातील सर्व ग्रामीण रुग्णालये,13 प्राथमिक आरोग्य केंद्रे व ढेबेवाडी कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांना तसेच कर्मचारी यांना 1200 पी.पी.ई. किट देण्यात आले आहेत.कोरोनाच्या संकटात जनतेला आधार देण्याबरोबर मतदारसंघातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही दिलासा देण्याचे काम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies