टाकाऊ पासून टिकाऊ ;तरुणाने तयार केली पाण्यावर चालणारी होडी.... - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

टाकाऊ पासून टिकाऊ ;तरुणाने तयार केली पाण्यावर चालणारी होडी.... टाकाऊ पासून टिकाऊ ;तरुणाने तयार केली पाण्यावर चालणारी होडी.... 


मिलिंदा पवार-खटावकोरोना व्हायरसचे सकंट जगभर घोंघावत असताना लाँकडाऊनच्या काळात एका तरुणाने पाण्यावर चालणारी होडी तयार केली आहे. सध्याच्या मोबाईल फँडच्या जमान्यात तरुणाई भरकटलेली असताना हा एक नवा पायंडा घातला आहे, फलटण पुर्व भागातील जावली गावच्या युवकांने कल्पना शक्ती च्या जोरावर आपल्या शेतातील टाकाऊ वस्तू पीव्हीसी पाईप लोखंडी पत्रे ,सळई कँनव्हास फेविकाँल यासाधन सामग्रीचा उपयोग करुन पाण्यावर चालणारी होडी बनवली आहे.

        ग्रामीण भागातील युवक दिनेश शेवते. (मु. शेवतेमळा,पो.जावली, ता. फलटण, जि. सातारा.) याने होडी आपल्या कल्पनेने तयार केल्याने  युवकांना चांगला संदेश मिळतो आहे, अशी पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे. आकारमानाने लहान व रुंद असुन त्याच्यात चार व्यक्ती सहजपणे आरामदायी बसु शकतात, पण हि होडी स्वतःच्या करमणूकीसाठी तयार केल्याची माहिती दिनेश शेवते यांनी दिली आहे.

या होडी चे वैशिष्ट्ये म्हणजे आकारमान लहान व रुदं असला तरी हलक्या वजनाने पाणी आत मधे शिरत नाही , समोरासमोर दोन सीट ,त्याच बरोबर होडी ला स्टेअरिंग सुद्धा बनवले आहे. साधारण पणे पाच किलोमीटर अंतरावर फिरण्यासाठी उपयोग होवु शकतो, सध्या जावली गावापासून दोन किमी अंतरावर शेवतेमळा याठिकाणी घडसोली तलावत निवासी होडी बनवण्यात आली आहे.वल्हाच्या मदतीने फिरू शकते, माहिती देत असताना सांगितले  कि ,भविष्यात मोटार बोट तयार करणार असल्याचे दिनेश शेवते यांनी सांगितले..

No comments:

Post a Comment