साताऱ्याचा अभिमान असलेला हसरा चेहरा हरपला - - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2020

साताऱ्याचा अभिमान असलेला हसरा चेहरा हरपला -

 साताऱ्याचा अभिमान असलेला हसरा चेहरा हरपला -  छत्रपती उदयनराजे भोसले यांची भावुक पोस्ट


कुलदीप मोहिते-कराड
सातारचे नुकतेच  लोकसभेवर निवडून गेलेले भाजपचे खासदार  छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका भावनिक पोस्टच्या माध्यमातून कोमल पवार यांच्या जाण्याचे दुःख व्यक्त केले उदयनराजे म्हणाले कोमल ही आपल्या लहान बहिणीप्रमाणे त्यांनी कोमल सोबतचा एक फोटो ही पोस्ट केला आहे. आणि फोटो वर लिहिलआहे सातारकरांसाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी एक दुःखद अशी ही बातमी आहे .कोमल ही सातारकरांचा एक अभिमान होती सातारचा हसरा चेहरा होती महाराष्ट्रातील पहिली दोन्ही  फुफ्फुसे आणि हृदय प्रत्यारोपण झालेली व्यक्ती पण तीन दिवसापूर्वी कोमलचा आजार वाढल्यामुळे तिला ताबडतोड हैदराबाद येथे शिफ्ट केले. कोमलच्या जाण्याची बातमी समजली आणि मन हेलावून गेले  .कोमलच्या परिवारास हे दुःख पचवण्याची ईश्वर शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .कोमल ही नेहमी आमच्या व सातारकरांच्या स्मरणात राहील सातारचा एक हसरा चेहरा हरविला

No comments:

Post a Comment