मजुरी करत आठवीतल्या मुलाने घेतला मोबाईल!!
कहाणी आत्मनिर्भरची
राम जळकोटे-उस्मानाबाद
घरात अठराविश्व दारिद्र्य ....घरातील खाती तोंडं आणि शेतीचा ताळमेळ जमेना ...पोरांना शिकवणार कसं अशी चिंता शेतकऱ्यांना पडलीय.मात्र अनेक संकटावर मात करत एका आठवीत शिकणाऱ्या मुलाने केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे 'आत्मनिर्भर' बना तर या पिटुकल्याच्या जिद्दीची ही बातमी.शिकण्याची जिद्द प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवते यातूनच स्पष्ट होतंय.सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केलं खरं पण शेतकऱ्यांच्या पुढची भ्रांत संपता संपेना.मग असलेल्या संकटावर मात कशी करायची मग त्याने रस्ता धरला शेतावर मोलमजुरी करायचा.मोबाईल पुरते पैसे त्याने मजुरी करून कमावले आणि मोबाईल घेऊन त्याचं शिक्षण सुरू झालं.ही हकीगत आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या बेटजवळगा गावच्या मुलाने शेतमजूरी करून मोबाईल विकत घेतला आहे. प्रेम गायकवाड शिक्षण आठवीच्या वर्गात शिकतो. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता.दत्तूने सोयाबीन काढायच्या कामाला जावून ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेतला आहे.